{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

व्हाय चीट इंडिया रिव्ह्यू – इम्रान हाश्मी आपल्याला या चित्रपटातून भारतीय शिक्षणव्यवस्थेतल्या त्रुटी दाखवतात

Release Date: 18 Jan 2019 / Rated: U/A / 02hr 01min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Mayur Lookhar

रोमांचक पटकथा आणि उत्तम अभिनयामुळे सौमिक सेनचा हा चित्रपट आपल्याला एन्टरटेन करण्यात यशस्वी होतो.

ना मला नायक व्हायचंय आणि खलनायक व्हायला माझ्याकडे वेळ नाही, मी एक प्लेयर आहे. असं जेव्हा राकेश सिंग अगदी सहजच बोलतो, तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा विश्वास दिसतो.

राकेश सिंग कोणी साधी व्यक्ती नसून राष्ट्रीय स्तरावर एक मोठा शैक्षणिक घोटाळा करणारा एक अत्यंत धूर्त आणि चलाख व्यक्ती आहे. आणि या चित्रपटातून निर्माता-अभिनेता इम्रान हाश्मी आपल्याला दाखवतात की राकेश सिंग सारखे धूर्त लोक कसे शिक्षण क्षेत्रात चाललेल्या या चढाओढीचा गैरफायदा घेतात आणि स्वतःचे खिसे भरतात.

राकेश सिंग आर्थिकदृष्ट्या कमजोर पण हुशार मुलांना पैशाचे अमिश दाखवून मोठ्या घरच्या श्रीमंत मुलांच्या जागी इंजिनिअरिंग, मेडिकल, बिसिनेस कॉलेजच्या प्रवेश परीक्षेसाठी बसवतो आणि त्याबदल्यात त्या श्रीमंत मुलांकडून बक्कळ पैसे उकळतो.

लखनऊ सारख्या शहरात आपले जाळे पसरवण्यात यशस्वी झालेला राकेश सिंगचं पितळ त्याच्याच एक विद्यार्थी सत्तू (स्निग्धदीप चॅटर्जी) मुळे उघडं पडतं. तरीही हार न मानता तो आपल्या भ्रष्टाचाराचे जाळे संपूर्ण देशभरात पसरवतो.

दिग्दर्शक सौमिक सेन यांनी या अगोदर गुलाब गॅंग (२०१४) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटाने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांची पण निराशा केली होती, परंतू व्हाय चीट इंडिया मुळे सौमिक सेन पुन्हा फॉर्म मध्ये आलेत असे म्हणू शकतो.

ज्ञानापेक्षा ग्रेड आणि मार्क्सना आपल्या शिक्षणव्यवस्थेत जास्त महत्व दिले जाते असा मेसेज या चित्रपटात दिलाय. १३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी नामवंत इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यात फक्त काही हजार विद्यार्थी यशस्वी होतात. त्यात शर्यतीच्या जगात आपली मुले मागे पडू नयेत असा पालकांचा दबाव या सर्वांमुळे कोचिंग क्लासेस आणि खोट्या इन्स्टिट्यूट ना मोकळे रान मिळाले आहे.

राजकुमार हिराणींच्या मुन्ना भाई एम बी बी एस (२००३) आणि थ्री इडियटस् (२००९) या चित्रपटांत शिक्षणव्यवस्थेतल्या त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या आणि व्हाय चीट इंडियामध्ये शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्टाचार दाखवला आहे. आजच्या काळातली कथा, उत्तम पटकथा आणि उत्कृष्ट अभिनयामुळे व्हाय चीट इंडिया खूपच एन्टरटेनिंग होतो.

इम्रान हाश्मी ने या अगोदर देखील ठगांच्या भूमिका केल्या आहेत. त्यांनी या अगोदर राजा नटवरलाल (२०१४) चित्रपटातसुद्धा ठगाची भूमिका केली होती. राकेश सिंग हा जरी खतरनाक व्यक्ती नसला तरी त्याला त्याच्या कृत्यांचा बिलकुल पच्छाताप नाही. कोर्टामध्ये सुद्धा तो आपल्या कृत्यांबाद्दल क्षमाभिलाषी नाही.

राकेश सिंग इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ३ वेळा नापास झाल्याने वडिलांकडून सतत बोलणी खावी लागत असत त्यामुळेच कदाचित तो या गैरमार्गाकडे वळला असावा.

हाश्मी या चित्रपटात अगदी हुशार दिसत आहेत. धूर्त माणसांच्या बोलण्यात एक वेगळीच लकब असते, त्याचाच वापर करून राकेश सिंग लोकांची मने जिंकतो.

तो कधीच आपला राग दर्शवत नाही. एका सीन मध्ये त्याचाच एक शिष्य त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी करतो तेव्हा तो बोलण्याबोलण्यातच त्याची चूक त्याला दाखवून देतो.

गेल्या सहा वर्षांपासून हाश्मींची कारकीर्द तळ्यातमळ्यात आहे. त्यामुळे हा चित्रपट त्यांची कारकीर्द पुन्हा वळणावर आणेल अशी त्यांची इच्छा असेल.

राकेश सिंग फक्त मुलांनाच त्याच्या कामासाठी नियुक्त करतो याचा अर्थ मुली कधीच भ्रष्ट असू शकत नाही असा होतो का? सेन या चित्रपटातून दाखवू इच्छितात की पुरुषप्रधान कुटुंबांमध्ये स्त्रियांना समान अधिकार भेटत नाही. श्रेया धन्वंतरी सत्तूची बहीण नुपूरची भूमिका करत आहेत. त्यांच्या वडिलांच्या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत परंतू नूपुरच्या बाबतीत त्यांची एकाच इच्छा आहे, ती म्हणजे लवकरात लवकर तिचे लग्न करून देणे.

मॉडेल आणि अभिनेत्री श्रेया धन्वंतरी यांचे हे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण आहे. पदार्पणातच श्रेया धन्वंतरी त्यांच्या अभिनयाची छाप सोडतात.

गेल्या वर्षी झोया हुसेन आणि बनिता सांधू यांनी मुक्काबाज आणि ऑक्टोबर या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. आता धन्वंतरीने सुद्धा त्यांच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. धन्वंतरींची निवड केल्याबद्दल कास्टिंग टीमचे अभिनंदनच करायला हवे. त्या उत्तरप्रदेशातल्या छोट्या शहरातल्या मुलीच्या भूमिकेत अगदी चपखल बसतात.

श्रेया धन्वंतरी बरोबर चित्रपटात आणखी एक अभिनेत्री (परवीन) आहेत ज्यांनी राकेश सिंगच्या पत्नीची भूमिका केली आहे. त्यांनी रंगवलेली सुंदर, सुशील, बडबडी आणि युपीच्या विशिष्ट शैलीत सतत टोचून बोलणारी बायको पाहायला मजाच येते.

सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. उत्तरार्धात मात्र चित्रपट थोडा प्रेडिक्टेबल होतो. नुपूरची राकेशच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री होते तेव्हा त्याला तिच्यावर बिलकुल संशय येऊ नये हे पटत नाही.

मी पेपर लीक करत नाही, ना हे माझ्या धंद्यासाठी चांगले आहे ना देशासाठी, असे जेव्हा राकेश सिंग कोर्टात बोलतो तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही की खोट्या परीक्षार्थ्यांकडून पेपर लिहून घेणे हा पेपर लीक करण्यापेक्षा छोटा गुन्हा कसा होऊ शकतो? त्यामुळे हा मुद्दा आपल्याला पटतच नाही.

प्रेडिक्टेबल दुसरा हाल्फ, राकेश सिंगने स्वतःच्या डिफेन्स मध्ये केलेला ना पटणारा उपदेश, आणि मेलोड्रॅमॅटिक क्लायमॅक्स मुळे चित्रपटाचा दर्जा थोडा घसरतो, पण तरीही सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय असलेला व्हाय चीट इंडिया चांगल्या मार्क्सने पास झाला असं म्हणायला हरकत नाही.

 

Related topics

You might also like