{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

वेडिंग चा शिनेमा रिव्ह्यू – या लग्न सोहळ्याला सगळ्यांनी आवर्जून यावे

Release Date: 12 Apr 2019 / Rated: U / 02hr 19min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Blessy Chettiar

ऋचा इनामदार यांच्या अभिनयात उस्फुर्तपणा जाणवतो. शिवराज वायचळ, संकर्षण कऱ्हाडे व प्रवीण तरडे यांच्या बोलीभाषेतल्या संवादांमुळे अत्यंत गमतीचा विनोद निर्मित होतो.

प्रकाश आणि परी एकत्र फोटो काढत आहेत, फोटोग्राफर त्यांना शांत बसायला सांगतोय, पण त्या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण चालू आहे. हा सीन म्हणजे उत्कृष्ट लिखाण, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय यांचे एक परफेक्ट उदाहरण आहे.

त्यांचे सर्व हावभाव उर्वी आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहे. उर्वी एक महत्वाकांक्षी फिल्ममेकर असून तिच्यावर या लग्नापूर्वीचे सगळे सोहळे शूट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उर्वीला जास्त बोलायला आवडत नाही. उर्वी चे पात्र आपल्याला जवळचे वाटते. तिला प्रेम वगैरे मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही.

परी (ऋचा इनामदार) सासवडला एका हॉस्पिटल मध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत असते त्यावेळी तिची भेट प्रकाश शी होते. प्रकाश परीला रक्तदानाचे शिबीर यशस्वी करायला मदत करतो आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचे लग्न ठरते, पण लग्नाअगोदरचे सगळ्या सोहळ्याची व्हिडिओ शूटिंग व्हावी अशी परीची इच्छा असते.

उर्वीचा कॅमेरामॅन मदन (भाऊ कदम) याला कोणीही कॅमेरामॅन म्हणून हाक मारलेली आवडत नाही. सर्वांनी त्याला डी ओ पी म्हणून हाक मारावी अशी त्याची इच्छा असते. भारतीय लग्नांमध्ये आपल्याला अनेक वृत्तीचे लोकं पाहायला मिळतात.

सलील कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटातली सगळीच पात्रे लिखाणातच उत्तम जमून आली आहेत. कोणती परी रक्त पिते? चित्रपटाच्या सुरवातीलाच हा संवाद आहे. यावरून चित्रपटाचा टोन कसा असेल याचा अंदाज येतो. काही प्रॉब्लेम्स आले तर त्यावर सुद्धा पटकन उपाय काढला जातो. मदन ने म्हटल्याप्रमाणे लोकांना हॅप्पी एंडिंग आवडते कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुद्धा हॅप्पी एंडिंग असेल ही आशा मिळते.

मध्यंतरापर्यंत चा वेळ लग्नाची तयारी दाखवण्यात खर्च केला आहे. भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेले दोन व्यक्ती इतक्या कमी वेळात एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करायचे कसं ठरवतात असा प्रश्न नक्कीच पडतो. सलील कुलकर्णी यांनी पालक नातेवाईक आणि इतर मित्रमंडळी यांच्या आपापसातील संवादातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडिओ इंटवरव्यु घेताना काही दुर्लक्षित प्रश्न पुन्हा समोर येतात. पण हे सर्व दाखवताना कुठेही चित्रपट कंटाळवाणा होत नाही. उत्तम संवाद सोबतीला तितकेच चांगले पार्श्वसंगीत यामुळे काही सीन्स उल्लेखनीय झाले आहेत. 'उगाचच कशाला भांडायचय', 'बोल पक्या बोल' आणि 'माझ्या मामाच्या लग्नाला' ही गाणी उत्तम जमून आली आहेत.

ऋचा इनामदार यांच्या अभिनयात उस्फुर्तपणा जाणवतो. शिवराज वायचळ, संकर्षण कऱ्हाडे व प्रवीण तरडे यांच्या बोलीभाषेतल्या संवादांमुळे अत्यंत गमतीचे विनोद निर्मिती होते.

शिवाजी साटम यांना वेगळ्या भूमिकेत पाहून छान वाटते. अलका कुबल, अश्विनी काळसेकर आणि सुनील बर्वे सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयातून चित्रपट आणखी उत्तम होण्यासाठी मदत केली आहे. सर्व भूमिकांसाठी योग्य कलाकारांची निवड केल्यामुळे चित्रपट एन्टरटेनिंग झाला आहे.

या समीक्षकाने नुकतीच लग्न या विषयाभोवती फिरणारी मेड इन हेवन ही वेब-सिरीज पाहिली. भारतीय लग्नसंस्था ही नवनवीन कथानकांसाठी जणू खजिन्याचा पिटाराच आहे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा आपली अपेक्षाभंग करत नाही.

प्रेम, लग्न आणि वेडिंग फिल्म्स यावर तुमचे वयक्तिक मत काहीही असले तरी १३८ मिनिटे आनंद देणारा वेडिंग चा शिनेमा तुम्ही नक्की पहा.

 

Related topics

You might also like