{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

टोटल धमाल रिव्ह्यू – हा चित्रपट सहा वर्षांच्या मुलांसाठी आहे

Release Date: 22 Feb 2019 / Rated: U / 02hr 10min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suparna Thombare

दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा टोटल धमाल बालिश विनोद, खराब वी एफ एक्स आणि हास्यास्पद कथानकाने भरलेला आहे.

विचार करा तुमच्याकडे अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्र, बमन इराणी, जॉनी लीवर, विजय पाटकर, पितोभाष, अश्विन मुश्रण, मनोज पाहवा आणि महेश मांजरेकर सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत आणि हे सर्व कॉमेडीच्या नावाखाली फक्त मूर्ख आणि बालिश गोष्टी करत आहेत, बस हाच तुमचा टोटल धमाल आहे.

टोटल धमाल मध्ये धमाल चे कथानक जशसताशे कॉपी केले आहेत.

एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याकडून चोरलेले ५० कोटी रुपये कुठे लपवले आहेत याचे रहस्य एक व्यक्ती मरताना (मनोज पाहवा) काही लालची लोकांसमोर सांगून टाकतो. आता ही सर्व लालची लोकं आपापल्या जोड्या बनवून जे काही साधन मिळेल त्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी जाण्यास निघतात.

हे पैसे एका प्राणि संग्रहालया मध्ये एका चिन्हाखाली लपवून ठेवले आहेत. अस्वल, वाघ, सिंह, गेंडा आणि माकड हे सर्व प्राणी सुद्धा या गोंधळामध्ये सामील आहेत. कदाचित अभिनेते कमी पडले तर त्यांची कमी भरून काढण्यासाठी या सर्व प्राण्यांची चित्रपटामध्ये वर्णी लागली असेल.

कथानक थोडे तरी संबद्ध वाटावे यासाठी चित्रपटाच्या शेवटी प्राणी वाचवण्याचा संदेश सुद्धा देण्यात आला आहे. आता ही गोष्ट वेगळी की हा संदेश सुद्धा एका प्राणि संग्रहालयात ज्यामध्ये प्राण्यांना कैद केले जाते अशा जागेवरून देण्यात आला आहे.

टोटल धमाल बालिश विनोद, खराब वी एफ एक्स आणि हास्यास्पद कथानकाने भरलेला आहे. चित्रपटाचा खूप वेळ सर्व पात्रांची ओळख करून देण्यात आणि काही खराब विनोद करण्यातच खर्च होतो.

आर्ट गॅलरी चे फार्ट गॅलरी हा जोक असुदे अथवा रितेश देशमुख आणि पीतोभाष या अग्निशामक दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लोकांकडून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पैसे मागणे अश्या विनोदांवर हसू की रडू तेच समजत नाही.

पण हळूहळू तुम्ही देखील हसू लागता. कदाचित तुम्ही या विचित्र कथानकाचा स्वीकार करायला लागता आणि त्यामुळे तुम्हाला या बालिश विनोदां वर देखील हसायला येते. आता प्रकाश, पारितोष पेंटर आणि बंटी राठोड यांनी लिहलेल्या इतक्या सर्व जोक्स पैकी काही जोक्सवर हसायला येणं यात काही नवल नाही.

जॅकी श्रॉफ यांचा चिंधी जीपीएस ची दृश्ये, विजय पाटकर बमन इराणीचा अपमान करतानाची दृश्ये, रितेश देशमुख देवाला लाच देण्याची दृश्ये आणि जॉनी लीवर यांच्या रिक्षा हेलिकॉप्टर ची दृश्ये यांसारखे काही मनोरंजक दृश्ये तुम्हाला नक्कीच हसवतात.

अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांची आदिमानव ही पात्रं यासर्व पात्रांमध्ये सगळयात जास्त मजेशीर आहेत आणि फक्त त्या दोघांवर सुद्धा एक वेगळा चित्रपट होऊ शकतो. त्यांना फक्त धमाल फ्रँचाइज मध्ये वापरणे हा त्या पात्रांवर अन्याय आहे.

तर दुसरीकडे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित १९ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहेत. या चित्रपटात त्यांनी अगदी घटस्फोटाच्या किनाऱ्यावर असलेल्या जोडप्याची भूमिका केली आहे. पण दुर्दैवाने या जोडीची कमाल पडद्यावर इतकी उठून दिसत नाही.

धमाल च्या इतर दोन चित्रपटां प्रमाणे हा चित्रपट सुद्धा बालिश आणि अतरंगी पात्रांनी भरलेला आहे पण भागां मध्ये विनोदी सुद्धा आहे.

जर तुम्हाला काही उत्कृष्ट कलाकारांना स्वतःचाच मजाक उडवताना पाहायचं असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही सहा वर्षाच्या मुलाच्या विनोदावर हसू शकता तर तुम्ही हा चित्रपट पाहायला नक्कीच जा. 

 

Related topics

You might also like