{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

ती अँड ती रिव्ह्यू: दोन स्त्रीयां मध्ये फसलेल्या पुरुषाची गोष्ट

Release Date: 08 Mar 2019 / Rated: U/A / 02hr 06min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ती अँड ती चित्रपटाची शूटिंग युरोप मधल्या काही अत्यंत सुंदर ठिकाणी केली आहे.

दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांचा ती अँड ती काही सुखद धक्के देतो. त्यातला एक धक्का म्हणजे ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला वाटले होते की चित्रपटातला काही भागच युरोप मध्ये शूट केला असेल, परंतु चित्रपट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की संपूर्ण कथाच युरोपमध्ये घडते.

लंडन व्यतिरिक्त चित्रपटात दिसणारे इतर प्रदेश देखील खूप सुंदर आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे क्वचितच घडते.

दुसरा सुखद धक्का म्हणजे पुष्कर जोग (अनय) आणि प्रार्थना बेहरे (सई) यांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा. बहुतेक वेळा आपल्या सिनेमां मध्ये स्त्रीया जास्त रोमँटिक असतात असे दाखवले जाते, पण या चित्रपटात अनय अतिशय रोमँटिक आहे. पावसात मागे म्युसिक वाजत असताना प्रपोज करणे, अगदी शेवटच्या क्षणी एअरपोर्टवर एखाद्याला थांबवणे या सारख्या अगदी फिल्मी रोमँटिक गोष्टी तो करतो.

दुसरी कडे सई मात्र याच्या पूर्ण विपरीत आहे, ती आर्किटेक्ट असल्यामुळे तिला जगभरातले म्युजियम आणि इतर वास्तू पाहण्यात जास्त रुची आहे.

अनय ला त्याच्या स्वप्नातली परी भेटत नाही म्हणून शेवटी तो आपल्या पालकांच्या सांगण्यावरून विवाह संकेतस्थळांवर नाव नोंदवतो. तिथे सई शी त्याची ओळख होते आणि काही वेळाने त्यांचं लग्न देखील होते. ते लंडन ला हनिमून साजरा करायला जातात. लंडन एअरपोर्ट ला पोहोचताच त्याची भेट होते त्याचे लहानपणीचे प्रेम असलेल्या प्रियंकाशी (सोनाली कुलकर्णी).

इथ पासून मात्र चित्रपट आपल्या आधुनिक विचारांची कात फेकून पुन्हा त्याच दोन स्त्रियां मध्ये गोंधळलेल्या पुरुषाची गोष्ट या टिपिकल वळणावर चालू लागतो. आणि यात काहीच नवल नाही की शेवटी त्याला माफ केले जाते. महिला दिनीच हा चित्रपट रिलीज होतोय हे एक विडंबनच.

तो सई बरोबर खुश राहील का प्रियंका बरोबर या मध्ये अनयचा गोंधळ उडालाय. तो लग्नानंतर देखील या बाबत का गोंधळला आहे या मागचे त्याचे लॉजिक आहे की तो आणि त्याच्या पत्नी ने अजून एकमेकांशी शरीर संबंध ठेवलेला नाही.

प्रियंका अनयची फक्त बालपणीची क्रश होती आणि ते दोघे कधी एकत्र नव्हते त्यामुळे अनय च्या गोंधळामागे काहीच लॉजिक नाही. चौथीत असताना त्याने प्रियंकाला शेवटचे पहिले होते जेव्हा ती दुसरीकडे राहायला जाते. त्यामुळे दोन दशकांनंतर तिच्याबद्दल अनयच्या मनात अजून त्याच भावना आहेत यावर विश्वास बसणे थोडं कठीण आहे. अनय जर खरोखर इतका रोमॅंटिक व्यक्ती असेल तर तो या अगोदर कधीच कोणाच्या प्रेमात का पडला नाही हे देखील पटत नाही.

दोन स्त्रीयां मध्ये गोंधळलेला पुरुष हे कथानक आता जुनं झालं आहे. आता तुम्ही म्हणाल की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे सिनेमे या अगोदर नाही आलेत, पण मुद्दा असा आहे की मराठी लोकांनी याच कथानकावर बनलेले गोविंदाचे चित्रपट पाहिले आहेत ना.

अनयची भूमिका निभावण्यासाठी लागणारे अभिनयकौशल्य पुष्कर मध्ये जरूर आहे परंतु काहीकाही ठिकाणी त्यांनी थोडी ओवरऍक्टिंग केले. तसेच गोविंदा आणि अनिल कपूर ने घरवाली बाहरवाली (१९९८) सारख्या चित्रपटातून या भूमिका इतक्या खुबीने निभावल्या आहेत की त्यांच्या तुलनेने पुष्कर अभिनयात कमीच पडतात.

सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघांनी पण आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. प्रार्थना बेहरे पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीच्या भूमिका करत आहेत. सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा त्यांच्या वाटेला आलेली भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे पण चित्रपटाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांची भूमिका निरर्थक आहे.

यां सारख्या चित्रपटां मध्ये आवर्जून येणारे विनोदी दृश्य म्हणजे दोन्ही स्त्रियांची एकमेकांशी भेट होऊ नये या साठी नवऱ्याला करावा लागणारा खटाटोप. आणि या चित्रपटात सुद्धा अशी दृश्ये आहेत. पण ती दृश्ये पाहून आपल्याला हसू मात्र येत नाही.

अगदी शेवटी असलेला एअरपोर्ट च्या सीन मध्ये मात्र आपल्याला थोडे हसू येते.

 

Related topics

You might also like