{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

ठाकरे रिव्ह्यू – या जीवनपटात फक्त नवाझुद्दीन सिद्दीकीच आपल्या अभिनयाची डरकाळी फोडतात

Release Date: 25 Jan 2019 / Rated: U/A / 02hr 18min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरेंच्या जीवनपटात १९९५ ला महाराष्ट्रात शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता येण्यापर्यंतचाच काळ दाखवला आहे.

कल्पना करा, एक हिंदी फिल्म हिरो आहे जो आपल्या माणसांवर होणाऱ्या अन्यायाने दुखी न होता त्वेषाने त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि त्या लोकांचा लीडर बनतो. अभिजीत पानसेंच्या ठाकरे या जीवनपटात अगदी हेच दाखवले आहे.

जेव्हा बाळ केशव ठाकरें सारख्या विवादित व्यक्तिमत्वावर त्यांच्याच पक्षाची निर्मिती असलेला चित्रपट रिलीज केला जातो तेव्हा तो चित्रपट म्हणजे फक्त व्यक्तिपूजा असणार यात शंकाच नाही. मग ते पर-राज्यातून आलेल्या लोकांविरुद्ध केलेला हिंसाचार असो वा बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेची असलेली भूमिका असो वा त्यानंतर झालेली दंगल असो, या सर्व गोष्टी दाखवताना ठाकरे मात्र चांगले व्यक्तीच आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाकरे, एक तडफदार तरुण, कार्टूनिस्ट म्हणून फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्रात रुजू होतात. तिथे कार्टूनिस्ट म्हणून थोडे यश मिळाल्यावर ते आपल्या कुंचल्यातून देशातल्या राजकीय व्यवस्थेची व्यथा मांडतात. याच कारणावरून त्यांचे संपादकाबरोबर वादविवाद होतात. नंदिता दास यांच्या मंटो (२०१८) मध्ये सुद्धा नायकाला या अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्या चित्रपटात मंटोची भूमिका नवाझुद्दीन यांनीच साकारली होती.

संपादकांच्या निर्बंधांमुळे ते नोकरी सोडून देतात आणि मार्मिक नावाचे स्वतःचे मासिक चालू करतात. मुंबईतल्या मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि हितासाठी काम करत असल्यामुळे मराठी लोकं त्यांना देवदूताचा दर्जा देतात.

मुंबईतल्या मराठी बांधवांच्या हक्कासाठी ते शिवसेना नावाची संस्था स्थापन करतात. आणि हळूहळू त्या शिवसेनेचे रूपांतर एका राजकीय पक्षात होते. आणि काही वेळातच ठाकरे महाराष्ट्रातले शक्तिशाली आणि आदरणीय व्यक्तिमत्व बनतात.

या चित्रपटात १९९५ ला महाराष्ट्रात शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता येण्यापर्यंतचाच काळ दाखवला आहे. चित्रपटाच्या शेवटी सिक्वेलची घोषणा देखील केली आहे, त्यामुळे १९९५ नंतरचा प्रवास दुसऱ्या भागात दाखवतील अशी आशा आहे.

ठाकरे आणि शिवसेना समर्थक मात्र हा चित्रपट खूप एन्जॉय करतील. ठाकरेंची स्टाइल आणि सोबतीला अड्रेनलाइन वाढवणारे पार्श्वसंगीत यामुळे ठाकरे समर्थकांच्या टाळ्या शिट्या पडतील.

याचे सर्वात मोठे श्रेय जाते नवाझुद्दीन सिद्दीकीला. प्रोस्थेटिकच्या मदतीने ते फक्त ठाकरेंसारखे दिसतच नाहीत तर त्यांनी ठाकरेंचे चेहऱ्यावरचे अगदी बारीक हावभाव, शारीरिक हालचाली आणि त्यांचा आवाज या सर्व गोष्टी अगदी परफेक्ट टिपल्या आहेत. कमवरेवर हात ठेवून उभे राहायची ठाकरेंची शैली सुद्धा नवाझुद्दीन यांनी अगदी हुबेहूब टिपले.

सिद्दिकींना अमृता राव, ज्या खूप वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहेत, त्यांची योग्य साथ लाभली आहे. ठाकरेंचे राजकीय विरोधक परंतु खूप जवळचे मित्र शरद पवारांच्या भूमिकेमध्ये निखिल महाजन यांनी सुद्धा ठीक अभिनय केला आहे. बाकीच्या कलाकारांना मात्र जास्त संधी मिळाली नाही.

ठाकरेंविरुद्ध सतत होणारे आरोप यामुळे त्यांच्याविरुद्ध समाजात अनेक गैरसमज निर्माण झाले होते हे चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाबरी मशिदीच्या खटल्यामध्ये आरोपी असलेले ठाकरे लखनऊ कोर्टात उभे असतात तो चित्रपटातला सर्वात महत्वाचा सीन आहे. हा संपूर्ण सीन खूपच फिल्मी झाला आहे.

ठाकरेंनी आप की अदालत या कार्यक्रमात व्यक्त केलेले मनोगत कोर्टामध्ये टेस्टिमोनी म्हणून वापरलं आहे. वकिलाची भूमिका तर विनोदीच झाले असं म्हणायला हरकत नाही कारण कोर्टात ठाकरे त्यांना अगदी सहज गप्प बसवतात.

जे सिनेमाचे चाहते आहेत त्यांचा हा प्रश्न असेल की ठाकरे चित्रपट म्हणून किती चांगला आहे? चित्रपट खूपच एन्टरटेनिंग आहे यात काहीच शंका नाही. परंतू दुसऱ्या हाफमध्ये पटकथा थोडी कमजोर झाली आहे. काही महत्वाच्या घटना पडद्यावर मांडताना खूपच घाई केली आहे असे वाटते, खासकरून मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष ते हिंदुत्ववादी पक्ष हे जे शिवसेनेच्या विचारसरणीचे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते चित्रपटात अगदी झटक्यात झाले आहे.

ठाकरेंची शिवाजी पार्क मधील भाषणे ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या महत्वाच्या घटनांपैकी एक. त्यांचे समर्थक आणि विरोधक पण त्यांच्या दसऱ्याच्या शिवाजी पार्क भाषणाची आतुरतेने वाट पाहत असत. परंतू चित्रपटात या महत्वाच्या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले आहे.

 

Related topics

You might also like