{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

स्ट्रीट डान्सर ३डी रिव्ह्यू – डान्सची दृश्य दाखवण्यासाठी १५० मिनिटांचा खेळ खंडोबा

Release Date: 24 Jan 2020 / Rated: U/A / 02hr 24min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

डान्स शिवाय स्ट्रीट डान्सर ३डी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर अभिनित एक लघुपट वाटलं असता.

रेमो डिसुझा यांच्या स्ट्रीट डान्सर ३डी चित्रपटाच्या पूर्वार्धात बराच काळ हेच कळत नाही कि या चित्रपटाला काय म्हणायचंय. लंडन मध्ये भारत आणि पाकिस्तानचे असे दोन ग्रुप असतात, ज्यांच्यात वाद आहेत आणि त्यांचं नेतृत्व क्रमशः सहेज (वरुण धवन) आणि इनायत (श्रद्धा कपूर) करत आहेत. भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळेस ते शाळेतील मुलांसारखे भांडतात. घोषणा देत ओरडण्या व्यतिरिक्त ते एकमेकांवर खाण्या-पिण्याच्या गोष्टी सुद्धा फेकून मारतात.

या सगळ्या गोंधळात गोष्ट अशी आहे. सहेज लंडन मध्ये पुनीत पाठकने साकारलेल्या आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. पंजाब मधून ते स्थलांतरित होऊन लंडन मध्ये एका पॉश ठिकाणी संपूर्ण सुविधांसोबत राहतात आणि हे सगळं शक्य होतं ते चालवत असलेल्या डान्स क्लासेसच्या भरवश्यावर.

ग्राउंड झिरो या स्पर्धेत पाठकच्या पात्राला दुखापत होते आणि सहेज भावाच्या जागी येऊन स्पर्धा जिंकायचं ठरवतो. इनायत मुख्य असलेल्या पाकिस्तानी ग्रुप बरोबर त्यांची सतत स्पर्धा असते. पबचा मालक अण्णा (प्रभू देवा) त्यांच्यामध्ये मैत्री घडवण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्यात सफल होत नाही.

डान्स स्पर्धेवर आधारित सिनेमात डान्स असतीलच यात शंका नाही. पण एबीसीडी (२०१३) आणि एबीसीडी २ (२०१५) च्या अगदी विरुद्ध स्ट्रीट डान्सर ३डी मध्ये डान्सचा सतत मारा होत असतो. हे डान्स बाजूला ठेवले तर हा चित्रपट म्हणजे एक लघुपट झाला असता. दृश्य चकचकीत आणि भडक दिसत असली तरी चित्रपटासाठी फक्त याचीच आवश्यकता असते का?

डान्सच्या नावावर यात अनेक एक्रोबॅटीक कसरती खपवला गेल्या आहेत. ते हि इतक्यांदा दाखवण्यात आले आहेत कि परत परत तेच दाखवण्यात येतंय असं वाटू लागतं.

चित्रपटाच्या शीर्षकामध्ये ३डी टाकून पण त्याचा फारसा उपयोग येथे झालेला दिसत नाही. काही मोजक्या दृश्यांमध्ये वस्तू इकडून तिडके फेकताना फक्त ३डी चा वापर जाणवतो.

'मुकाबला' हे गाणं सोडलं तर चित्रपटाचं संगीत सुद्धा निराशाजनक आहे. प्रभू देवा आणि नगमा यांच्या १९९४ मध्ये आलेल्या काधलन (हिंदीत हमसे है मुकाबला) या सिनेमातील मूळ गाण्याला रीमिक्स रूपात या चित्रपटात दाखवण्यात आलंय.

अभिनयाचं म्हणाल तर चित्रपटात सगळेच डान्स मध्ये सर्वोत्तम देताना अभिनयाला बहुतेक विसरेलेलेच दिसताहेत. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर एकत्र छान दिसतात आणि ते नाचले देखील उत्तम, पण त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षा होती. त्यांच्या व्यक्तिरेखेतच कमतरता असल्यामुळे त्यांनाही फार दोष देता येत नाही. नोरा फतेही स्वतःचीच भूमिका साकारताना दिसतात. 

अपारशक्ती खुराणा आणि पुनीत पाठक यांनीच काय ते अभिनयाला गंभीरपणे घेतलंय असं दिसतं. प्रभू देवा डान्सिंग मध्ये कमालच आहेत, पण त्यांची हिंदी मात्र त्यांचा प्रभाव कमी करते.

स्ट्रीट डान्सर ३डी मध्ये इलिगल मायग्रेशनचा मुद्दा सुद्धा मांडलेला आहे. अर्थात तो चुकून हास्यास्पद झालेला आहे. एक पंजाबी ग्रुप आहे ज्यांना गैर मार्गाने लंडन मध्ये स्थायिक व्हायचंय, अर्थातच काम मिळावे हीच त्यांची अपेक्षा. पण हे काम करून देणाऱ्याला त्यांच्यातील प्रत्येक जण रु४० लाख द्यायला तयार आहेत. जर तुमच्याकडे एवढे पैसे आहेत तर मग तुम्ही बेकायदेशीर पणे राहण्याची रिस्क कशाला घेता?

ग्राउंड झिरो या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेबद्दलही काही शंका आहेत. यात काही स्पर्धक मध्येच आपली टीम बदलतात, कुणाचा स्पर्धेचा डान्स सुरु असताना कुणीतरी मध्ये म्युझिकचा प्लग काढतो आणि आयोजक त्या ग्रुप ला बाद ठरवतो. त्यात तो हे हि म्हणतो, "हि माझी कॉम्पिटिशन आहे, इथे माझे नियम चालतील." आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशा चालवतात का?

 

Related topics

You might also like