Mayur Lookhar
Mumbai, 01 Mar 2019 8:00 IST
चंबळ मध्ये घडणाऱ्या या अभिषेक चौबे दिग्दर्शित डाकूंच्या चित्रपटात लालच, जातिभेद, बदला आणि प्रायश्चित या सर्व भावनांचे मिश्रण आहे.
अंधारात चालवलेल्या बंदुकीचा निशाणा कदाचित लक्ष्य भेदेल सुद्धा पण त्याने चुकून कोना निर्दोष व्यक्तीचा जीव गेला तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते.
कुख्यात डाकू मानसिंह (मनोज वाजपेयी) आणि लखन (सुशांत सिंग राजपूत) यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप आहे परंतु प्रायश्चित हा पर्यायच नाही डाकूंकडे.
२०१९ मध्ये लेखक सुदीप शर्मा आणि दिग्दर्शक अभिषेक चौबे तुम्हाला त्या काळात घेऊन जतात जेव्हा चंबळ मध्ये अनेक डाकू आणि त्यांच्या गँग्सची दहशत होती.
जसे चित्रपटांमध्ये सांगतात की या पात्रांचा कोणत्याही खऱ्या व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा तसेच चित्रपटातील मुख्य पात्र काल्पनिक आहेत. मनोज वाजपेयींच्या पात्राचे नाव १९४०-५० मधील आणि १९७०-८० मधील एका खऱ्या डाकूवरून ठेवले आहे हे एकच साम्य आहे. शेखर कपूरच्या बैंडिट क्वीन (१९९४) मध्ये त्यांनी त्या डाकूची भूमिका निभावली होती.
सोनचिडीया एका काळातील मध्य भारताचे चित्र आपल्या समोर रंगवतो. अत्यंत गरिबी, जातीभेद आणि वर्गभेद, बदल्याची भावना आणि लालच यामुळे अनेकांनी आपल्या हातात बंदुका घ्यायला सुरुवात केली.
चंबळ मधल्या बहुतेक गँग्स या जातीभेदावर आधारित होत्या. सोनचिडीया मध्ये मानसिंह च्या नेतृत्वाखाली ठाकूर डाकू गुज्जर जातीच्या रक्तासाठी हपापलेले आहेत. पण एका चुकलेल्या हमल्याच्या योजनेमुळे आता पोलीस ऑफिसर वीरेंद्र सिंह गुज्जर (आशुतोष राणा) अक्खी टास्क फोर्स घेऊन या डाकूंच्या मागे लागला आहे. वीरेंद्र सिंहचे या मागे काही वयक्तिक कारण सुद्धा आहे.
ट्रेलर रिलीज झाला तेव्हा भूमी पेडणेकरच्या पात्राची फुलन देवीच्या पात्राशी तुलना करण्यात आली. पण इंदुमतीची मनाला चटका लावणारी स्वतःची वेगळी कथा आहे. ती एका १२ वर्षाच्या मुलीला घेऊन आपला जीव वाचवून पळत आहे आणि त्या मुलीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे.
त्यावेळी लखन तिला मदत करतो परंतु यासाठी त्याला आपल्याच टोळीच्या विरद्ध उभे राहावे लागते. त्यामुळे आता शिकाऱ्याचीच शिकार होण्याची संभावना निर्माण झाली आहे.
दिग्दर्शक अभिषेक चौबे विशाल भारद्वाज यांचे शिष्य आहेत. त्यांनी ओमकारा (२००६) आणि कमीने (२००९) ची पटकथा लिहली होती. इश्किया (२०१०) चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यानंतर त्यांनी देढ इश्किया (२०१४) व उडता पंजाब (२०१६) हे चित्रपट दिग्दर्शित केले.
चौबेंच्या चित्रपटातील मुख्य पात्रांमध्ये पण अनेक वाईट सवयी असतात आणि स्वतःची अशी एक विनोदाची शैली असते. सोनचिडीया मात्र अजिबात डार्क कॉमेडी या शैलीत मोडत नाही. हा खूपच सिरीयस चित्रपट आहे. डाकूंमध्ये छोटीमोठी बाचाबाची होते पण या कथानकामध्ये चौबेंच्या खास विनोदी शैलीला जागा नाही, म्हणूनच त्यांनी कदाचित चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहण्याची जबाबदारी सुदीप शर्मांवर सोपवली.
लेखक-दिग्दर्शकाच्या द्वयीने या चित्रपटाचे कथानक आणीबाणीच्या काळात घडवण्याचा निर्णय घेतला. फुलन देवीची डाकू म्हणून ख्याती १९७९ नंतर पसरायला सुरवात झाली परंतु या चित्रपटात अभिषेक चौबे आणि सुदीप शर्मा यांनी त्या आणीबाणीच्या काळातच एक कुख्यात डाकू आहेत असं दाखवलं आहे.
आणीबाणीमध्ये कथानक असल्याने चित्रपटात आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे आणीबाणी असो व नसो डाकू बिनधास्त त्या काळात कोणालाच न घाबरता वावर करत असत, आणि आणीबाणीमुळे पोलिसांना हवं तेव्हा डाकूंना मारून टाकण्याची मुभा मिळाली होती.
शोले (१९७५) मधला गब्बर सिंह हा आपल्या चित्रपट सृष्टीतला सगळ्यात आयकॉनिक डाकू आहे. डाकुंवर आळा घातल्या पासून भारतीय सिनेमांत देखील त्यांच्या कहाण्या दाखवणे हळूहळू कमी झाले. तिग्मांशु धुलियाचा पान सिंह तोमर (२०१२) हा खेळाडू ते डाकू बनलेल्या पान सिंह तोमर वर आधारित होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला शेखर कपूर दिग्दर्शित बैंडिट क्वीन (१९९४) ही सुद्धा फुलन देवीच्या आयुष्याची विदारक कथा होती.
चौबे ने त्या प्रदेशाच्या बोलीभाषेवर जास्त भर दिला आहे परंतु हे देखील ध्यानात ठेवले आहे की यामुळे इतर प्रेक्षक चित्रपटापासून तुटले जाऊ नये.
चौबेंच्या या कथेला सुदीप शर्मांच्या उत्तम पटकथा आणि संवादाची साथ मिळाली आहे. सोनचिडीया चे प्रोडक्शन डिजाइन (रिटा घोष) उत्तम झाले आहे. अनुज राकेश धवनचे छायाचित्रण सुद्धा चांगले झाले आहे. खासकरून मनोज वाजपेयीवर शूट केलेले कमी प्रकाशातले सीन्स आपल्याला प्रभावित करतात. नरेन चंद्रावरकर आणि बेनेडिक्ट टेलर यांचे खिळवून ठेवणारे पार्श्वसंगीत आणि विशाल भारद्वाज यांचे संगीत यामुळे चित्रपट आणखी प्रभावशाली होतो.
चित्रपटातील इतर तांत्रिक गोष्टी बाजूला ठेवल्या तर सर्वच कलाकारांचा उक्तृष्ट अभिनयामुळे ही कथा आणखी विश्वसनीय होते. बाजपेयीना वगळले तर इतर कलाकार पहिल्यांदाच डाकूंची भूमिका साकारत आहेत. एक कुख्यात डाकू असले तरी सुशांत सिंगची भूमिका इतरांच्या तुलनेने थोडी शांत आहे. परंतु एका ट्रॅजेडी मुळे त्याचा आत्मा खडाडून जागा होतो. जेव्हा त्याचे साथीदार म्हणतात एका विद्रोहीला आपला धर्म पाळावा लागतो त्यावेळी लखन त्यांना विचारतो की विद्रोहीचा धर्म तरी काय? राजपूत लखनचे आत्मिक द्वंद्व दाखवण्यात यशस्वी झाले आहेत.
उत्तर भारतातल्या छोट्या गांवातल्या मुलीची भूमिका करण्यात भूमी पेडणेकर तरबेज आहेत. दम लगा के हैशा (२०१५), टॉयलेट – एक प्रेम कथा (२०१७) आणि शुभ मंगल सावधान (२०१७) चित्रपटांतून त्यांनी हे सिद्ध केले आहे. इंदुमतीचे पात्र या सर्वां पेक्षा वेगळे आहे, पेडणेकरने इतके गंभीर पात्र या अगोदर कधीच निभावले नव्हते. ही स्त्री जखमी झाली असली तरी बंदूक हाताळू शकते. जेव्हा सर्व डाकू तिला घेराव घालून तिच्यावर बंदूक ताणतात तेव्हा तीदेखील लगेच डोक्यावर पदर घेऊन त्यांच्यावर बंदूक ताणते. पेडणेकर चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात.
आशुतोष राणा, वाजपेयी, रणवीर शोरे आणि महेश बलराज हे सर्वच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रभावित करतात. जतीन सरना आपल्याला सेक्रेड गेम्स (२०१८) मधल्या त्यांच्या अभिनया पेक्षा अत्यंत वेगळ्या अभिनय शैलीची झलक दाखवतात. इंदुमतीच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या मुलाने सुद्धा उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवले आहे.
इंटरव्हल नंतर चित्रपट थोडा दिशा भरकटतो परंतु थोड्याच वेळात पुन्हा योग्य ट्रॅकवर येतो. चौबेंचा सोनचिडीया मध्ये खूप हिंसाचार नाही. या चित्रपटाची खरी ताकद ही चित्रपटाचं कथानक आहे. या सोन्याच्या चिडियाची हाक तुम्ही नक्की ऐका.
Related topics
You might also like
Review Hindi
Jogi review: Diljit Dosanjh-starrer is more like a thriller revolving around 1984 riots
The Ali Abbas Zafar film takes you by surprise with the riot angle brought in much earlier in the...
Review Hindi
Matto Ki Saikil review: Prakash Jha leads this sentimental saga of socio-economic inequality
Written and directed by M Gani, the Hindi film is a patchy yet heartbreaking look at the bleak class...
Review Hindi
Jhini Bini Chadariya review: A moving lamentation for the holy city of Varanasi
Ritesh Sharma’s hard-hitting film lays bare the social fabric of the city and the growing...