{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

सेटर्स रिव्ह्यू – चित्रपट पास होतो, पण द्वितिय श्रेणी मध्ये

Release Date: 03 May 2019 / Rated: U/A / 01hr 59min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

श्रेयस तळपदे आणि आफताब शिवदासानी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतात.

आपण अनेक चित्रपटांमध्ये लोकांना लुबाडणारे खलनायक पहिले आहेत. पण बहुतेक सर्वच चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या फक्त वाईट छटाच आपल्याला दाखवल्या जातात. क्वचितच आपल्याला नीरज पांडे यांचा स्पेशल २६ (२०१३) अथवा राम गोपाल वर्मा यांचा कंपनी (२००२) असे चित्रपट पाहायला मिळतात ज्यामध्ये खलनायकाच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात.

अश्विनी चौधरी दिग्दर्शित सेटर्स मध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळतं. अपूर्व ठाकूर (श्रेयस तळपदे) पेपर लीक करणे तसेच इंजिनीरिंग आणि रेल्वे च्या परीक्षांमध्ये खोटे परीक्षार्थी पाठवणे अश्या गोष्टी करण्यात एक्स्पर्ट आहे. अपूर्व त्याच्या व्यवसायाबद्दल खूपच काटेकोर असला तरीही एका गरीब मुलीला तो पेपर्स फुकट देतो.

भारतीय शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटींचा फायदा उचलत हे क्रिमिनल्स आपला व्यवसाय चालवतात. बनारस म्हणजेच वाराणसी मधून भैय्याजी (पवन मल्होत्रा) हे मोठं रॅकेट चालवतात. अपूर्व त्यांच्या हाताखाली काम करतो.

रेल्वे परीक्षेच्या पेपर लीक च प्रकरण खुप मोठं झाल्यामुळे इन्स्पेक्टर आदित्य सिंह वर भैय्याजी आणि अपूर्व ला पकडायची जबाबदारी सोपवली जाते. अपूर्व आणि आदित्य हे कॉलेजमध्ये मित्र होते.

ही पेपर लीक करणारी गॅंग कशी सफाईदारपणे आपले काम करते हे या चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला पेपर लीक चा सीन वास्तववादी वाटतो. या सीनपासूनच चित्रपट आपल्यावर पकड घेतो.

सेटर्स मध्ये कलाकारांची निवड देखील आपल्याला आश्चर्यचकित करते. आफताब शिवदासानी ही भूमिका पेलू शकतील का याबाबत शंका होती, परंतु त्यांनी आपल्या अभिनयातून आपल्या सर्व शंकांचं निरसन केलं. शिवदासानी प्रथमच पोलिसांची भूमिका साकारत आहेत.

श्रेयस तळपदेंनी सुद्धा त्यांच्या नेहमीच्या विनोदी भूमिकांना फाटा देऊन गंभीर छटा असलेली भूमिका केली आहे. पवन मल्होत्रा तर अक्षरशः भैय्याजी ची भूमिका जगलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वयाची साठी ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांनी जे शरीर कमावलंय त्यासाठी सुद्धा त्यांची दाद द्यायला हवी.

स्त्रियांच्या वाट्याला मात्र जास्त काही आलं नाही. इशिता दत्त यांच्या वाट्याला अगदी छोटी भूमिका आहे तर सोनाली सेहगल ज्युनियर पोलीस ऑफिसर च्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत.

सेटर्स च्या पहिल्या हाफ मध्ये हा पेपर लीक चा व्यवसाय कसा चालतो यावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे पहिल्या हाफ मध्ये चित्रपट खूपच इंटरेस्टिंग वाटतो. पण जवळजवळ सर्वच हिंदी चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटसुद्धा दुसऱ्या हाफ मध्ये आपली जादू कायम राखण्यात अपयशी ठरतो.

दुसऱ्या हाफमध्ये अपूर्व आणि भैय्याजी यांच्या नात्यामध्ये एक मोठा बदल घडतो जो आपल्या तार्किक बुद्धीला बिल्कुल पटत नाही. दुसऱ्या हाफ मध्ये पटकथे मध्ये सुद्धा अनेक त्रुटी जाणवू लागतात.

चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये खलनायकांना पोलिसांनी पकडले का नाही हे आपल्याला समजत नाही. क्लायमॅक्स पाहता असे वाटते लेखकांनी याचा सिक्वेल बनवायचा अगोदरच ठरवले होते किंवा त्यांना चित्रपटाचा शेवट कसा करावा हेच समजले नाही.

 

Related topics

You might also like