{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

रोमिओ अकबर वॉल्टर रिव्ह्यू – हे मिशन यशस्वी करण्यासाठी जॉन एब्रहम यांना चांगल्या स्क्रिप्ट ची आवश्यकता होती

Release Date: 05 Apr 2019 / Rated: U/A

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Story:

Shriram Iyengar

रॉब्बी ग्रेवाल दिग्दर्शित या चित्रपटामध्ये टेन्शन चा अभाव आहे.

जॉन एब्रहम यांना त्यांच्या स्क्रिप्ट च्या निवडीसाठी श्रेय देणे गरजेचे आहे. मद्रास कॅफे (२०१३) नंतर त्यांनी परमाणू – द स्टोरी ऑफ पोखरण (२०१८) आणि सत्यमेव जयते (२०१८) सारख्या काही इंटरेस्टिंग स्क्रिप्ट्स निवडल्या.

रॉब्बी ग्रेवाल दिग्दर्शित रोमिओ अकबर वॉल्टर ही सुद्धा अशीच एक धाडसी निवड आहे. युद्धकाळात युद्ध जिंकण्यासाठी शत्रू गोटातली गुप्त माहिती मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे या चित्रपटात दाखवले आहे.

पण चित्रपटात टेन्शनचा अभाव असल्यामुळे चित्रपट जास्त प्रभाव पाडू शकला नाही.

रोमिओ एक बँकेचा सामान्य कर्मचारी आहे. रिसर्च अँड ऍनालिसीस विंग चे प्रमुख श्रीकांत राय (जॅकी श्रॉफ) रोमिओ ला १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याची गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून पाठवतात.

पाकिस्तानात तो अकबर म्हणून राहू लागतो. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात येते की तो या बुद्धिबळाच्या खेळाचा फक्त एक प्यादा आहे. पाकिस्तानसाठी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या इसाक आफ्रिदी पर्यंत पोहचताच त्याच्या लक्षात येते की आय एस आय कमांडर खान (सिकंदर खेर) त्याच्या मागावर आहे.

कोणत्याही युद्धात गुप्त माहिती मिळवणे किती महत्वाचे असते हे या कथानकातून अधोरेखित केले आहे. गेल्या दोन वर्षात भारतीय गुप्तहेर खात्यांकडून झालेल्या चुका लक्षात घेता हा चित्रपट अगदी योग्य वेळेला रिलीज झाला आहे. प्रमुख अधिकारी आणि त्याच्या हाताखाली काम करणारा गुप्तहेर यांच्या नात्यावरसुद्धा या चित्रपटात प्रकाश टाकला आहे. यामुळे चित्रपट आणखी इंटरेस्टिंग झाला आहे.

कमजोर पटकथा हाच चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. या प्रकारात मोडणाऱ्या कोणत्याही चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या टेन्शन आणि थरार या चित्रपटात अनुभवता येत नाही. चित्रपटाचा फर्स्ट हाफ सेकंड हाफ पेक्षा जास्त थरारक आहे. चित्रपटाचे संवाद देखील आपली अपेक्षाभंग करतात. रोमिओ/अकबर चा पाकिस्तानी एजंट होण्यापर्यंतचा प्रवास सुद्धा आपल्याला पटत नाही. 

२ तास २० ही चित्रपटाची लांबीदेखील चित्रपटाच्या विरोधातच जाते. अकबर ते श्रीकांत ते खान या तिघांच्या दृष्टिकोनातून कथा सांगितली आहे त्यामुळे चित्रपट आपल्यावर सतत पकड ठेऊन राहत नाही. काही पात्रे लिखाणातच कमजोर आहेत त्यामुळे जॉन आणि राय च्या पात्रांशी इमोशनल कनेक्ट होत नाही.

जॉन ने एका गंभीर गुप्तहेराच्या भूमिकेत आपला जम बसवला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या सतत गंभीर वागण्यामुळे चित्रपट पाहताना आपल्याला हळूहळू  कंटाळा येऊ लागतो. जॅकी श्रॉफने सुद्धा रॉ प्रमुखाच्या भूमिकेसाठी आपली नेहमीची भिडू ची इमेज बदलली आहे.

सिकंदर खेर चित्रपटातला आश्चर्याचा पॅकेज आहे. आपल्या आर्मी मधला गुप्तहेर शोधून काढणे हे एकमेव ध्येय असलेला ऑफिसर खान च्या भूमिकेत खेर ने उत्तम अभिनय केला आहे. खासकरून जॉन बरोबर त्यांचे काही सीन्स छान जमून आले आहेत. रघुबीर यादव छोट्याश्या भूमिकेतसुद्धा आपली छाप सोडून जातात.

चित्रपट स्टाइलिश पद्धतीने शूट करण्यात आलाय. कलाकारांचे हावभाव जास्त उठून दिसण्यासाठी कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यांच्या अगदी जवळ नेऊन सीन्स शूट केले आहेत पण त्यामुळे जॉनचा विग आपले लक्ष विचलित करतो.

अनेक त्रुटी असल्या तरी रोमिओ अकबर वॉल्टर हा एक हेरगिरीवर आधारित थरारपट बनवण्याचा एक चांगला प्रयत्न होता. संयत आणि विचारपूर्वक बनवलेल्या या चित्रपटात थरार जास्त असता तर आणखी चांगला होऊ शकला असता.

 

Related topics

You might also like