{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

पीएम नरेंद्र मोदी रिव्ह्यू – जीवनपट नव्हे हा तर टिपिकल मसालापट!

Release Date: 24 May 2019 / Rated: U / 02hr 11min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

नरेंद्र मोदी या चित्रपटात बंदुकीच्या गोळ्यांची तमा न बाळगता झेंडा फडकवणारे हिंदी चित्रपटातल्या नायका सारखे दर्शवले आहेत.

उमंग कुमार दिग्दर्शित पीएम नरेंद्र मोदी हा नरेंद्र मोदींचा जीवनपट आहे असे सांगण्यात आले होते, परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच "नाट्यनिर्मितीसाठी कथेमध्ये काही काल्पनिक बदल केले आहेत" अशी पाटी येते.

चित्रपट पाहताना सतत आपल्याला ही लाइन आठवत राहते कारण जीवनपटाच्या नावाखाली उमंग कुमार यांनी एक टिपिकल मसाला एन्टरटेनर बनवला आहे ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान प्रमुख भूमिकेत आहेत. दुर्दैवाने चित्रपट आपली करमणूक देखिल करत नाही.

बालपणातल्या नरेंद्र मोदींना, म्हणजेच सर्वांचा लाडका 'नरु'ला, चहा विकायची खूप आवड. नरू आपल्या चहाचे नाव देखिल ठेवतो – 'मोदी की चाय'. जणु त्याला ठाऊक होते कि ५० वर्षानंतर तो चहावाला म्हणून पंतप्रधान पदाची निवडणूक लडवणार.

लहानपणापासूनच नरुच्या मनात भारतीय सैन्याविषयी खूप आदर. म्हणूनच १९६२ च्या भारत-चीन युद्धासाठी निघालेल्या सैनिकांना तो फुकट चहा पुरवतो.

मोदी तरुण असताना काही काळासाठी संन्यासी झाले होते हे आपणास ठाऊक आहे आणि त्यांनी स्वतः ते अनेक ठिकाणी बोलून दाखवलं आहे. परंतु चित्रपटात मोदी देव आनंद यांचा गाईड (१९६५) पाहून संन्यासी जीवन पत्करायचा निर्णय घेतात असे दाखवले आहे.

चित्रपटात मोदी (विवेक ओबेरॉय) जशोदाबेन शी लग्न न करता संन्यासी होतात असे दाखवले आहे. परंतु २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात त्यांनी मान्य केले होते की त्यांचे लग्न झाले होते. निर्मात्यांनी याअगोदर सांगितले होते की बरखा बिश्त सेनगुप्ता या चित्रपटात जशोदाबेन यांची भूमिका साकारतील, परंतु या काल्पनिक कथेमध्ये सुद्धा जशोदाबेनच्या वाट्याला काहीच आले नाही.

स्वतःचे ध्येय लक्षात आल्यानंतर मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये सामील होतात. ते गुजरात सरकार विरुद्ध आपले पहिले आंदोलन सुरु करतात आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी ते 'तुमचे बँक बॅलन्स वाढवायचे असेल तर माझ्यासोबत या' असा मजकूर लिहलेली पत्रके वाटतात. फिर हेरा फेरी (२००६) मध्ये बिपाशा बसू देखील अश्याच पद्धतीने लोकांना लुबाडतात. फरक इतकाच की इथे लोकांच्या मनात त्याबद्दल कसलाच आकस नाही.

सन १९९१-९२ मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर ला काढलेल्या एकता यात्रेचे नेतृत्व मुरली मनोहर जोशी यांनी केले होते, परंतु चित्रपटात नरेंद्र मोदी हातात तिरंगा घेऊन यात्रेचे नेतृत्व करताना दिसतात.

सन २००२ साली गुजरात दंगलीमध्ये असहाय असलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जखमी लोकांना मदत करताना दिसतात.

पत्रकार करण थापर सोबत मोदींचा फेमस इंटरव्यू, ज्यामध्ये ते दंगलीबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता निघून जातात, ती घटना सुद्धा या चित्रपटात आहे, परंतु त्यात एक ट्विस्ट आहे. चित्रपटात मात्र मोदी करण थापरला निरुत्तर करतात.

इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खलनायक म्हणून दाखवले आहे. डॉ मनमोहन सिंह यांचे पात्र तर दी ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (२०१८) मधल्या अनुपम खेर यांच्या पात्रापेक्षाही वाईट आहे. प्रशांत नारायण सारखे उत्तम अभिनेत्यांचे अभिनय कौशल्य सुद्धा वायाच घालवले आहे.

ओबेरॉय यांनी गेल्या काही वर्षात चांगला चित्रपट निवडला नसला तरी ते उत्तम अभिनेते आहेत यात शंका नाही. या चित्रपटातही त्यांचे काम चांगले झाले आहे परंतु ते नरेंद्र मोदीसारखे दिसत नाहीत.

मनोज जोशींनीसुद्धा भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भूमिका निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, पण चित्रपटात त्यांच्या नावाचा उच्चार म्यूट केला आहे.

पीएम नरेंद्र मोदी मध्ये एकामागून एक अनेक घटना होत राहतात पण त्यांना योग्य फ्लो नाही. मोदींना एक संत म्हणून लोकांसमोर उभं करायचा हा एकमेव हेतू या चित्रपटाच्या निर्मितीमागे होता असे वाटते. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने सुद्धा म्हटले होते की 'हा चित्रपट म्हणजे जीवनपट नसून स्तुतिपट आहे'.

 

 

Related topics

You might also like