{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

फोटोग्राफ रिव्ह्यू: एकाकीपणा वर भाष्य करणारी ही साधीसोपी लव्ह स्टोरी आपल्या स्मरणात राहील

Release Date: 15 Mar 2019

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

रितेश बात्राच्या या कथे मध्ये सान्या मल्होत्रा ने अप्रतिम अभिनय केला आहे, परंतु काही दुर्लक्ष न करता येण्या सारख्या त्रुटींमुळे हा चित्रपट द लंचबॉक्स च्या तुलनेने कमी पडतो.

रितेश बात्राच्या प्रेमाच्या शोधात असलेल्या दोन व्यक्तींची ही कथा पाहताना 'तुमने मुझे देखा, होकर मेहरबां' हे गाण्याचे शब्द ओठांवर येतात.

रितेश बात्रा ने द लंचबॉक्स (२०१३) मध्ये सुद्धा हीच थीम हाताळली होती. दुर्दैवाने फोटोग्राफ मध्ये मात्र स्टोरीपेक्षा स्टाइलवर जास्त भर दिला आहे. कथे मध्ये एकसंधतेचा अभाव असला तरी सान्या मल्होत्रा ने या भूमिकेतून त्यांच्या अभिनय कौशल्याचा पुरावा दिला आहे.

मुंबई मधल्या भिन्न समाजातल्या दोन व्यक्तींमधल्या प्रेमाची आणि मैत्रीची गोष्ट फटोग्राफ या चित्रपटामध्ये दाखवली आहे. रफिक (नवाझुद्दीन सिद्दीकी) गेटवे ऑफ इंडियाला फटोग्राफर आहे तर मिलोनी (सान्या मल्होत्रा) चार्टर्ड अकाउंटेंट च्या फायनल परीक्षेची तयारी करत आहे.

रफिकची आजी (फारुख जफर) सतत त्याला लग्न करायला सांगत असते. एक दिवस तो त्याने काढलेला मिलोनीचा फोटो दाखवून ही त्याची गर्लफ्रेंड नूरी असल्याचे आपल्या आजीला सांगतो. हे ऐकताच त्याची आजी मुंबईला तिला भेटायला येते. आता नाइलास्तव रफिक मिलोनीला त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक करायला सांगतो. सततच्या कुटुंबाच्या दबावातून बाहेर येण्यासाठी मिलोनी सुद्धा त्याची गर्लफ्रेंड होण्याचे नाटक करायला तयार होते. हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होते.

द लंचबॉक्स सारखा या चित्रपटातसुद्धा तुडुंब गर्दी असलेल्या शहरातल्या लोकांमध्ये असलेल्या अबोल नाते संबंधांवर भाष्य केले आहे. कुल्फी आणि कॅम्पा कोला च्या आठवणी ताज्या होतात. हळूच बात्रा आपल्याला शहरात वसलेल्या लोकांच्या आपापल्या छोट्या जगात घेऊन जातात. या जगात टेक्नॉलॉजी ला जागा नाही. छोट्या झोपड्यात राहणारे एकाकी जीव आणि त्यांच्या सोबतीला असलेली जुनी हिंदी गाणी असे जग बात्रा ने उभे केले आहे.

पण फोटोग्राफ ला द लंचबॉक्स सारखा नॅच्युरल फ्लो नाही. असंबद्ध पटकथा, विचित्र एडिटिंग अश्या काही गोष्टी गरज नसताना सुद्धा चित्रपटात आहेत. काही उत्कृष्ट सीन्स सोडले तर चित्रपटात काही त्रुटी सुद्धा आहेत. मीलोनी आणि रफिक या दोघांच्या राहणीमानातला फरक रफिकच्या आजीच्या लक्षात न येणे, आताच्या काळात जेव्हा लैंगिक अत्याचाराचा धोका खूप वाढला आहे त्यावेळी मिलोनीने रफिक च्या प्रस्तावाला होकार देणे या सारख्या गोष्टी तार्किक वाटत नाहीत.

सतत दडपणाखाली वावरत असलेल्या मिलोनीच्या भूमिकेत सान्या मल्होत्राने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. आपल्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये त्या अधिक चांगला अभिनय करत आहेत. स्वतःच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्याची मुभा नसलेल्या मुलीच्या भूमिकेत सान्या ने संयत अभिनय केला आहे.

रफिकच्या रूपात तिला एक चांगला मित्र भेटतो आणि त्याच्या बरोबर असताना तिला स्वतंत्र असल्याचा फील येतो. सान्या प्रेक्षकांना मिलोनीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येऊ देत नाहीत. रफिक बरोबर पहिल्या भेटीची काल्पनिक गोष्ट गुंफताना आपण जेव्हा मिलोनीला पाहतो त्या वेळी आपल्याला तिच्या कुटुंबाच्या दडपणाखाली लपवून ठेवलेले एक वेगळेच व्यक्तिमत्व दिसते.

दुसरी कडे नवाझुद्दिनच्या वाट्याला मात्र लिखाणातच कच्ची असलेली भूमिका आली आहे. डायलॉग्स ला योग्य फ्लो नसल्याने मोठ्या पडद्यावर पाहताना डायलॉग्स आपल्याला भावत नाहीत.

चित्रपटात इतर काही कलाकार सुद्धा आहेत. जिम सरभ आणि सचिन खेडेकर कथे मध्ये थोडा ड्रामा आणतात. गीतांजली कुलकर्णीचे पात्र आपल्याला मिलोनीच्याच कुटूंबात असलेल्या वर्गभेदाची जाणीव करून देते. ती मिलोनीची एकमेव मैत्रीण आहे. विजय राज यांची सुद्धा छोटी भूमिका आहे, पण त्यांच्या भूमिकेचा कथानकावर काही विशेष फरक पडत नाही.

तीसरी मंजिल चित्रपटातल्या गाण्या सारखे हा चित्रपट शहरातला एकटेपणा आणि या क्रूर शहराला करुणेची किती गरज आहे याची आठवण करून देतो. चित्रपटाची कथा कल्पकतेने हाताळली असती तर हा चित्रपट आणखी चांगला झाला असता.

 

Related topics

You might also like