{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

पंगा रिव्ह्यू – एका आईची कबड्डी मध्ये परतण्याची हृदयस्पर्शी कथा

Release Date: 24 Jan 2020 / Rated: U / 02hr 12min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Sonal Pandya

अश्विनी अय्यर तिवारी यांनी गोड, आपल्याशा वाटणाऱ्या आणि हास्यरंजक पद्धतीने एका आईची स्पोर्ट्स करिअर मध्ये परतण्याची गोष्ट तितक्याच प्रामाणिकपणे मांडली आहे. 

एका आफ्रिकन वाक्प्रचारानुसार एका मुलाला वाढवायचं असेल तर एका गावाला एकत्र यावं लागतं, पण अश्विनी अय्यर तिवारी यांच्या पंगा (२०२०) मध्ये, एका आईला तिच्या खेळात परतण्यासाठी आणि देशासाठी खेळण्यासाठी एका गावाला एकत्र यावं लागतं. अभिनेत्री कंगणा रनौत यांनी अत्यंत सहज आणि स्वाभाविक पद्धतीने एका आईची तिची स्वतःची ओळख परत मिळवण्याची धडपड दाखवली आहे.

जया निगम (रनौत) भोपाळ, मध्य प्रदेश, मध्ये राहणारी एक स्त्री. तिचा नवरा प्रशांत सचदेव (जस्सी गिल) आणि ती भारतीय रेल्वे मध्ये कामाला आहेत. त्यांचा मुलगा आदी (यज्ञ भसीन) सात वर्षांचा आहे. तिघांचंही छान चाललंय, पण जयाला कसली तरी उणीव भासतेय.

नव्या कबड्डी प्लेयर्स कडून न ओळखलं जाणं, बॉस कडून अनादर होणं आणि शाळेच्या स्पोर्ट्स डे वर ना आल्यामुळे आदीचं तिच्यावर नाराज होणं, यामुळे जया विचार करू लागते कि तिने आयुष्याशी एक प्रकारे मनजुळणी करून घेतली आहे, नाही तर तिचं आयुष्य आज काही औरच असतं.

जेव्हा आदीला त्याच्या आईच्या खेळाबद्दल कळतं, तो तिला पुन्हा खेळण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी उद्युक्त करतो. जया फिट राहण्याची प्रॅक्टिस सुद्धा सुरु करते आणि हळू हळू कबड्डी खेळण्याचा आत्मविश्वास कमावते. तिची मैत्रीण आणि पूर्व सह-खेळाडू मिनू (रिचा चड्ढा) तिला प्रोत्साहन देते आणि मार्गदर्शन सुद्धा करते.

प्रशांत आणि आदीच्या मदतीने जया कबड्डी खेळू लागते, तिच्यापेक्षा वयाने लहान आणि फिट असलेल्या मुलींशी खेळत भारताकडून खेळण्याचं स्वप्न पुन्हा बघू लागते.

जयाची गोष्ट काल्पनिक असली तरी तिचा व्यक्तिगत संघर्ष मेरी कॉम, सेरेना विल्यम्स, पॉला रॅडक्लिफ आणि आता सानिया मिर्जा, ज्यांनी नुकतीच ऑस्ट्रेलियाला झालेली स्पर्धा मातृत्वानंतर जिंकली, या सगळ्यांऐवढाच मोठा आहे.

पंगा मध्ये जयाचा हा संघर्ष उत्तम मांडण्यात आलेला आहे. ३२व्या वर्षी स्वतःला आपल्या सोबत असलेल्यांपुढे आणि विरोधात असलेल्या लोकांसमोर सुद्धा सिद्ध करून दाखवणे कठीण असते. अश्विनी अय्यर तिवारी आणि निखिल मल्होत्रा यांनी नितेश तिवारी यांच्या साहाय्यतेने पटकथेमधून या प्रामाणिक गोष्टीत काही क्षण खूपच शिताफीने गुंफलेले आहेत. विनोद आणि भावना यांच्या सुंदर मिलापाने हि गोष्ट मांडण्यात आली आहे.

रिचा चड्ढा यांची मिनू आपले मन लगेच जिंकते. त्यांचे बिनधास्त संवाद सुद्धा पैसे वसूल आहेत. त्यांची भूमिका हि साहाय्यक अभिनेत्रीची असली तरी त्यांनी पाहुण्या कलाकाराचं क्रेडिट देण्यात आलंय हे बघून आश्चर्य वाटतं. बाल कलाकार यज्ञ भसीन याने मोठ्यांचा समजूतदारपणा दाखवत उत्तम काम केले आहे. जस्सी गिल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत या समजूतदार पतीच्या भूमिकेतून छान पदार्पण केले आहे. नीना गुप्ता जयाच्या आईच्या छोट्या भूमिकेतसुद्धा आपला छाप सोडून जातात.

रनौत तर जयाच्या मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींनी जयाचे पात्र उत्तम रंगवले आहे. कबड्डी मध्ये परतल्यावर जो राग त्या व्यक्त करतात, त्याहीपेक्षा त्यांचा मूक अभिनय अधिक बोलका झालाय. या खेळाला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जिम मध्ये प्रॅक्टिस करताना ते इंटरनॅशनल चॅम्पियनशिप पर्यंत हा खेळ दिसतो. ज्यांना या खेळाबद्दल काहीच माहिती नाही त्यांनाही हा चित्रपट बांधून ठेवतो.

अश्विनी अय्यर तिवारी यांची विशेषतः म्हणजे त्यांनी जयाला सामान्य माणसासारखंच दाखवलं आहे. जेव्हा जया मीनूला कबड्डी मध्ये आई म्हणून तिला काही मर्यादा येतात हे सांगते, किंवा जेव्हा ती तिच्या नवऱ्याला सांगते कि दुसऱ्या शहरात खेळासाठी जाण्याची ऑफर ती मान्य करणार नाही, तेव्हा हे प्रसंग कुठल्याही सामान्य घरी होऊ शकतात हे पटते.

संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा यांचं पार्श्वसंगीत आणि शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत प्रचंड ऊर्जाशील आणि चित्रपटाचा मूड बांधून ठेवण्यात यशस्वी झालंय. शेवटच्या प्रसंगात जेव्हा जयाच्या मनात शंका-कुशंका येतात आणि तिचा सामना सुद्धा सुरु आहे, अशावेळी तिचा स्वतःवरचा होणार विजय, या प्रसंगाची मुद्दाम दाखल घ्यावी लागेल.

पंगा म्हणजे फक्त स्वप्न बघण्याची हिम्मत करणे नव्हे, तर ते पूर्ण करण्यासाठी आपण जी पावलं उचलतो त्याबद्दलचा हा चित्रपट आहे. हि खेळाची गोष्ट तुमच्या मनाचा ताबा नक्की घेईल.

 

Related topics

You might also like