{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

नोटबुक रिव्ह्यू – या फसलेल्या कथानकामध्ये प्रभावी छायाचित्रण ही एकमेव चांगली गोष्ट आहे

Release Date: 29 Mar 2019 / Rated: U / 01hr 55min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Blessy Chettiar

उत्कृष्ट छायाचित्रण आणि सटीक एडिटिंग याव्यतिरिक्त झहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पाहण्यासारखे काही नाही.

श्रीनगरमधील दाल तलावाचे सौंदर्य काही औरच आहे. तलावातून मंद गतीने वाट काढत जाणारे शिकारा, दूरवर बर्फाची चादर ओढलेले डोंगर, तलावातच वसलेले भाजी मार्केट आणि तलावाच्या काठी खेळणारी शाळकरी मुले असे विहंगमय दृश्य मनोज कुमार खातोइ यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

दुर्दैवाने उत्कृष्ट छायाचित्रण आणि सटीक एडिटिंग याव्यतिरिक्त झहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पाहण्यासारखे काही नाही.

नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि काश्मीर मधल्या रहिवाश्यांच्या मनात धुमसत असणारा असंतोष हा विरोधाभास नक्कीच सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पण दाराब फारुकी यांची पटकथा आणि शारीब हाश्मी व पायल राहताब यांनी संवादाचा फोकस कथेवर ठेवून एक सकारत्मक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटात काश्मिरी पंडित आणि दहशतवादाचा देखील हलकासा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो देखील फसलाय आणि याचे मुख्य कारण म्हणजे झहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल या दोन्ही मुख्य कलाकारांमध्ये नसलेले संवादफेकीचे कौशल्य आणि तोकडे अभिनयकौशल्य.

माझी सैनिक कबीरला जेव्हा कळते की त्याच्या वडिलांनी सुरु केलेल्या शाळेसाठी शिक्षकाची आवश्यकता आहे तेव्हा तो नाईलाजाने ही नोकरी स्वीकरतो. जगाशी संपर्क तुटलेल्या या खोऱ्यात कबीर एका साथीदारासह शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या शोधात निघतो. कबीरला मुलांशी कसे वागायचे माहित नाही तरीही हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री होते.

त्याला शाळेच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये अगोदरची शिक्षिका फिरदौस (बहल) हिची डायरी सापडते. डायरीतून त्याला विद्यार्थ्यांशी कसे वागावे हे समजते. डायरी वाचता वाचता झहीर फिरदौसच्या प्रेमात पडतो. ती कशी दिसते याची काहीच कल्पना नसताना फक्त तिच्या हातावर असलेल्या एका टॅटूच्या जोरावर तो तिचा शोध घ्यायला सुरुवात करतो. पण त्याच्या पदरी निराशाच पडते.

फिरदौसच्या डायरीतून आपल्याला प्रथम तिच्या भूतकाळा विषयी कळते, नंतर झहीरचा भूतकाळ सुद्धा उलगडतो.

दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी चित्रपटात काहीतरी मिसिंग आहे असे सतत आपल्याला वाटत राहते. चित्रपटाचा कालावधी  २ तासापेक्षा कमी आहे तरीही कथानक अगदी संथ गतीने पुढे जात राहते. या सर्वच गोष्टी चित्रपटाच्या विरोधात जातात.

दोन्ही प्रमुख कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट दुःखद करणे हे बॉलिवूडच्या जातकुळीला शोभत नाही. झहीर आणि बहल प्रमुख भूमिकेत असले तरी चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटासाठीच ते आपल्याला एकाच फ्रेम मध्ये दिसतात. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री उत्तम आहे का साधारण हे सांगणे तसे कठीणच आहे.

काश्मिरी रहिवाश्यांच्या आपल्या मुलांना हिंसाचारापासून दूर ठेवण्यासाठी करावे लागणारे अथक प्रयत्न चित्रपटात दाखवले आहेत. दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करतात, सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा स्क्रीन टाइम मिळाला आहे. इम्रान असो वा दुआ, सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे आणि कुठेही ओवरऍक्टिंग होत नाही ना याचे सुद्धा भान राखले आहे.

ज्युलियस पॅकियम यांचे पार्श्वसंगीत ठीक आहे. काही ठिकाणी आवश्यकता नसताना सुद्धा पार्श्वसंगीत वापरले आहे. 'नई लगदा' आणि 'सफर' ही विशाल मिश्र ने संगीतबद्ध केलेली गाणीसुद्धा खूप वेळ आपल्या स्मरणात राहतील.

२००८ मध्ये घडणाऱ्या या लव्ह स्टोरीमध्ये प्रियकर प्रेयसी दोघेही डायरीतून एकमेकां विषयी जाणून घेतात हे पचायला थोडे कठीण आहे. रोमान्स मध्ये आत्माच नसेल तर उत्कृष्ट छायाचित्रण यासारख्या गोष्टीसुद्धा तुमचा चित्रपट वाचवू शकत नाही.

 

Related topics

You might also like