{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

लकी रिव्ह्यू – प्रेम आणि वासनेवर विनोदी भाष्य

Release Date: 07 Feb 2019 / Rated: U/A / 01hr 56min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:

Suparna Thombare

दिग्दर्शक संजय जाधवांचा लकी हा थोडा अतिशयोक्त कॉमेडी असलेला एन्टरटेनिंग चित्रपट आहे.

लकी हा प्रासंगिक विनोद या प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. पण चित्रपटात आजच्या तरुणाईसाठी एक संदेश देखील आहे.

प्रेम आणि शारीरिक आकर्षण या द्वंद्वात अडकलेल्या एका पुरुषाची ही कथा आहे.

लकीला कॉलेजमधली सर्वात लोकप्रिय आणि बिनधास्त मुलगी आवडते. तिच्याबरोबर सेक्स करून दाखवेल अशी तो आपल्या मित्राबरोबर पैज लावतो. आता ती पैज पूर्ण करण्यासाठी  गोव्यात राजकीय अराजकतेचे वातावरण आणि संप चालू असताना त्याला कसे गोव्याच्या दुकानांत कोंडमच्या शोधात फिरावे लागते हे आपण या चित्रपटात पाहतो.

या सर्वांची सुरुवात होते जेव्हा जिया (दीप्ती सती) लकीला कानाखाली मारते. तेव्हा लकीचा मित्र (मयूर मोरे) लकीची खास मैत्रीण श्रुतीबरोबर पैज लावतो की तो एका महिन्याच्या आत जिया बरोबर सेक्स करेल आणि जर तो यात अपयशी ठरला तर ते दोघे फक्त अंडरवेअर वर पूर्ण कॉलेजमध्ये फिरतील.

आपण या पद्धतीचे कथानक याअगोदर दिल (१९९०) आणि तेजाब (१९८८) या हिंदी चित्रपटांमध्ये पहिले असले तरी या चित्रपटाचा उद्देश आणि मांडणी पूर्णपणे वेगळी आहे.

लकीच्या नशिबात लहानपणापासूनच खोट आहे. आईवडिलांबरोबर राहत असलेल्या लकीच्या डोक्यावर एका लोकल गँगस्टरचा हात आहे.

प्रेमाच्या बाबतीत तो कमनशीबीच आहे त्यामुळे प्रेमच्याबाबतीत सर्व गोष्टी त्याच्या मनाविरोधीच होत असतात. एकदा कोंडमच्या शोधात भटकत असताना त्याला स्वतःचीच ओळख होते.

लकीचा मित्र (मोरे) त्याला त्या मुलीबरोबर सेक्स करण्यास प्रोत्साहित करतो पण तो ज्या ज्या लोकांना त्याच्या कोंडमच्या शोध मोहिमे दरम्यान भेटतो ते मात्र त्याला या मार्गाने न जाण्याचे सुचवतात.

हृदय आणि मेंदू या दोघांमध्ये चालू असलेले हे द्वंद्व पडद्यावर दाखवण्यात लेखक संजय जाधव आणि अरविंद जगताप यशस्वी झाले आहेत.

इंटरव्हल नंतरचे विनोदी प्रसंग आपल्याला खळखळून हसवू शकत नाहीत पण ही कमी चित्रपटातल्या काही विचित्र पात्रांनी भरून काढली आहे.

लकीच्या या शोध मोहिमे दरम्यान तो ज्या ज्या पात्रांना भेटतो ती सर्व पात्रे खूपच संस्मरणीय आहेत. अतुल तोडणकर यांचा पठडीबाज गे पानवाला ते सोज्वळ दुकानदार ते क्रेन चालवणारा (शशांक शेंडे) ते अगदी वृद्ध हवालदार असे सर्वजण आपली छाप सोडून जातात.

नवोदित कलाकार अभय महाजन आणि दीप्ती सई यांचा अभिनय आश्वासक आहे. खासकरून महाजन यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.

चित्रपट जरी विनोदी असला तरी काही वेळा ओढूनताणून विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत सुद्धा विनाकारण लाऊड आहे, काही वेळाने त्याचा कंटाळा यायला लागतो.

आजकालच्या तरुण पिढीमधले असलेले कन्फ्युजन आणि या तरुण पिढी आणि अनुभवी प्रौढ व्यक्ती या दोघांमध्ये संवाद होणे किती आवश्यक आहे यावर चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपटात सेक्स आणि कोंडम तसेच पालक आणि मुलांमध्ये आवश्यक असणारा मनमोकळा संवाद यावर सुद्धा भाष्य केले आहे.

दिग्दर्शक संजय जाधवनी प्रासंगिक विनोदी चित्रपटातून एक संदेश दिला आहे परंतू विनोदी प्रसंगांची अतिशयोक्ती टाळायला हवी होती. हा चित्रपट तुमचे भरपूर भरपूर मनोरंजन करेल एवढे मात्र नक्की.

 

Related topics

You might also like