{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

केसरी रिव्ह्यू: बॉर्डर (१९९७) चे अपडेटेड वर्जन

Release Date: 21 Mar 2019 / Rated: U/A / 02hr 30min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

अनुराग सिंह दिग्दर्शित केसरी एन्टरटेनिंग असला तरी ऐतिहासिक तथ्यची मात्र अपेक्षा ठेवू नका.

बॉर्डर मध्ये सुनील शेट्टी जेव्हा अँटी-टॅंक घेऊन जातात किंवा सनी देओल बझुका वापरून साहतरु पक्षाचा टॅंक उडवून टाकतात तेव्हा जर तुमच्या धमन्यांमधून रक्त सळसळले असेल आणि तुम्हाला त्याची पुन्हा अनुभूती घ्यावयाची असेल तर तुम्ही अनुराग सिंह दिग्दर्शित केसरी नक्की पाहू शकता.

अक्षय कुमार ची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात देशभक्तीची परिसीमा गाठली आहे. बॉर्डर (१९९७) चा रेफरन्स देण्यामागे काही नकारात्मक हेतू बिल्कुल नाही. अनुराग सिंह चा चित्रपट आपले मनोरंजन करण्यात मात्र कुठे कमी पडत नाही. चित्रपटातील जोश जागवणारे संवाद ऐकून ऐन गर्दीच्या वेळी विरार ची लोकल पकडू शकाल इतका जोश तुमच्या अंगात येतो.

कथा साधी सोपी आहे. हविलदार इशर सिंह (अक्षय कुमार) ला आपल्या ऑफिसरचे आदेश न मानल्यामुळे सारगढी वर पाठवले जाते. त्याच वेळी पश्तून ओरकझाई आणि पठाण सारगढी चे किल्ले जिंकून ब्रिटिशांच्या उत्तर-पश्चिम भागातल्या वर्चस्वाला थोपवण्याचा निर्णय घेतात. २१ सैनिक शेवटपर्यंत लढा देतात आणि इतिहासात कायमस्वरूपी आपले नाव नोंदवून जातात.

चित्रपट मनोरंजक असला तरी स्लो आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक हविलदार सिंह भोवतीच फिरते. तो एक स्वाभिमानी लढवैय्या सैनिक आहे. अक्षय कुमार ने भूमिका चांगली निभावली आहे.

पहिल्या हाफ मध्ये थोडा विनोदी स्वभाव असलेला हविलदार सिंह शेवटचे युद्ध येईपर्यंत एक गंभीर व्यक्ती बनतो. अक्षय कुमार वर चित्रित झालेली ऍक्शन दृश्ये प्रभावी झाली आहेत. त्यांना वीरगती प्राप्त होतानाचे दृश्य मात्र त्याच्या चित्रीकरणामुळे आपल्याला अस्वस्थ करते.

ऍक्शन दृश्यांची कोरिओग्राफी अगदी वरचा क्लास झाली आहे. लढाईची दृश्ये आणि त्यांचा इम्पॅक्ट कित्येक पटीने वाढवणारे पार्श्वसंगीत तुम्हाला नक्कीच इमोशनल करेल. ड्रॅक्युलाच्या तोंडाला पाणी सुटेल इतके रक्त चित्रपटात आहे.

इमोशनल सीन्स ठळक इम्पॅक्ट सोडतात. सैनिकांचे आपापसातले संबंध दाखवणे तसेच त्यांना सामान्य रहिवाश्यांच्या वेशात आणण्याची ट्रिक जुनी असली तरी प्रभावी आहे.

चित्रपटात काही त्रुटी सुद्धा आहेत. परिणीती चोपडा च्या पात्राची चित्रपटात काही आवश्यकता नव्हती. चित्रपट सुरु होताना क्रेडिट मध्ये पाहूणा कलाकार म्हणून त्यांचे नाव दिले आहे.

चित्रपटामध्ये नाट्यमयता आणण्यासाठी काही घटनांमध्ये बदल केले आहेत अशी चित्रपट सुरु होण्या आधीच पाटी आल्यामुळे चित्रपट ऐतिहासिक तथ्यांशी किती प्रामाणिक आहे हे न बोललेच बरे. पण चित्रपटात देशभक्तीचा अतिवापर मात्र टाळायला हवा होता. जिहादी मुल्ला वर आधारित खलनायक चे पात्र रचले आहे ते आताच्या काळाशी जोडण्यासाठी असावे पण त्यामुळे ब्रिटिशांच्या अफगाणिस्तान मधल्या आक्रमणाविरुद्ध लढणारे पठाण हे खलनायक दाखवणे पटत नाही.

चित्रपटात जिंगोईजम ठासून भरले आहे. मुघल आणि इंग्रज यांना आक्रमणकारी संबोधून आजकाल चर्चेत असलेल्या राजकीय विचारप्रणाली ला हवा द्यायचा प्रयत्न केला आहे. आपल्या समाजाप्रती शिखांची निष्ठा या चित्रपटात दाखवली आहे.

काही त्रुटी असल्या तरी हा चित्रपट आपल्याला सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. जरी त्या महान वीरांचे साहस दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला असला तरी त्या सत्य घटनेवर प्रकाश जरूर टाकतो.

टेनिसन ने लिहले होते, 'देयर्स नॉट टू क़्वेश्चन व्हाय / देयर्स बट टू डू एंड डाय' आणि त्याच प्रमाणे ते प्रश्न न विचारता वीरगती प्राप्त करतात. त्यामुळेच क्वीन विकटोरीया ने सुद्धा त्या २१ सैनिकांची प्रशंसा केली.

सारगढीच्या युद्धाची तुलना त्यापूर्वी झालेल्या थर्मोपायली आणि बालाक्लावा च्या युद्धांशी केली जाते. काही त्रुटींकडे दुर्लक्ष केले तर हा अत्यंत मोरंजक चित्रपट आहे जो सामान्य जनतेला वेड लावेल. चित्रपटात थरार आहे पण त्यासाठी तथ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पण आपल्याला राजकीय नेत्यांनी शिकवलेच आहे की तुम्हाला सामान्य जनतेला इतिहास शिकवायचा असेल तर त्यात थोडा मसाला लावणे आवश्यक आहे. ज्यांना तथ्यांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी पुस्तकं वाचावीत.

 

Related topics

You might also like