{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

कागर रिव्ह्यू – हा राजकीय विषयावरचा चित्रपट हवा तितका प्रभाव पाडू शकला नाही

Release Date: 26 Apr 2019 / 02hr 21min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

मकरंद माने दिग्दर्शित कागरमध्ये रिंकू राजगुरू आणि शशांक शेंडे यांचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळतो.

कागरमध्ये रिंकू राजगुरु प्रियदर्शनी उर्फ राणी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहेत. राणी महाराष्ट्रातल्या विराईनगर गावातल्या एका श्रीमंत कुटुंबातून आली आहे. ती गरीब कुटूंबातल्या युवराज (शुभंकर तावडे) याच्या प्रेमात आहे.

हे वाचताच तुम्हाला सैराट (२०१६) ची आठवण झाली असेल. त्या चित्रपटातसुद्धा राजगुरू एका श्रीमंत कुटुंबातली मुलगी असून एका गरीब आणि खालच्या जातीतल्या परशा (आकाश ठोसर) याच्या प्रेमात पडते. अजून एक सीन आपल्याला सैराटची आठवण करून देतो, जेव्हा राणी युवराज व त्यांच्या मित्रांसोबत गुंडांपासून पळत असतात.

या व्यतिरिक्त या दोन चित्रपटांमध्ये काही साम्य नाही. विविध राजकीय डावपेच हा या चित्रपटाचा विषय आहे. राजनीती (२०१०, हिंदी) आणि झेंडा (२००९, मराठी) या चित्रपटांमध्ये मोठ्या शहरातले राजकारण दाखवले होते. पण गेल्या दोन दशकांमध्ये गाव तसेच छोट्या शहरातल्या राजकारणावर आधारित फारच कमी चित्रपट आले आहेत.

गुरुजी (शशांक शेंडे) आणि आबा (सुहास पळशीकर) हे या गावातले दोन मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहेत. गुरुजी गावामध्ये चाणक्य म्हणून ओळखले जातात. एकेकाळी गुरुजी आणि आबा यांची घनिष्ठ मैत्री होती, परंतु काही कारणास्तव गुरुजी दुसऱ्या पक्षात गेले.

शेंडेंनी या चित्रपटात पण त्यांच्या लौकिकाला साजेसाच अभिनय केला आहे. पूर्णवेळ ते भूमिकेमध्येच असतात. अगदी हाताची बारीक हालचाल अथवा चष्मा काढून पुसणे यां सारख्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ते खूप काही व्यक्त करून जातात.

अगदी काहीच दिवसात युवराज गुरुजींचा विश्वासू माणूस बनतो. एक उत्तम पुढारी होण्याचे सगळे गुण युवराजमध्ये असतात. त्याच्या व्यक्तिमत्वातील एकमेव दुर्गुण म्हणजे तो खूप तापट डोक्याचा आहे. आपल्या वडिलांचा अन्यायाच्या विरोधात लढताना झालेल्या मृत्यूमुळे तो अजूनही अस्वस्थ आहे. गुरुजींना मात्र युवराज आणि आपली मुलगी राणी यांच्या नात्याबद्दल बिल्कूल खबर नाही.

माने यांनी महाराष्ट्रातल्या गावपातळीवर चालणारे राजकारण दाखवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सर्व पात्रांना योग्य वेळ दिल्यामुळे सगळी पात्रे, म्हणजे अगदी युवराजचा मित्र सुद्धा, आपली छाप सोडून जातात.

कागरचे पार्श्वसंगीत उत्तमच नव्हे तर हटके सुद्धा आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे पार्श्वसंगीत वापरले आहे.

रिंकू राजगुरूंनी पुन्हा एकदा उत्कृष्ट अभिनयाचा नमुना दिला आहे. व्यक्तिरेखेमध्ये हळूहळू होणारा बदल त्यांनी योग्यरीत्या दाखवला आहे. शहरातच राहिले असले तरी तावडे यांनी गावचा लहेजा छान पकडला आहे.

एवढ्या सर्व उत्तम गोष्टी असून सुद्धा कागर आपल्या अपेक्षे समोर फेल ठरतो आणि त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे चित्रपट फक्त ड्रामा राहण्या एवजी थरारपट बनण्याचा प्रयत्न करतो. राजकीय थरारपट बनवण्यात काही गैर नाही, परंतु याचा अर्थ आपण लॉजिकला फाटा देणे असा होत नाही.

राणी व युवराज जेव्हा अचानक कोणालाही कळू न देता लग्न करायचं ठरवतात त्या सीनमध्ये लॉजिकचा मोठा घोळ आहे. खरंतर त्यांच्या नात्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, राणीचे कुठे दुसरीकडे लग्न ठरले अशातली ही काही बाब नसते, त्यामुळे त्यांचा अचानक लग्न करायचा निर्णय पटतच नाही.

दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा अशेच काही लॉजिकचे घोळ आपल्याला आढळतात. अगदी क्लायमॅक्सला गुरुजी अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्ण विरोधी निर्णय घेतात हा त्यातला सर्वात मोठा घोळ. त्यामुळे एक उत्कृष्ट राजकीय थरारपट होता होता राहिला असे वाटते.

 

Related topics

You might also like