{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

दिठी रिव्ह्यू – तीव्र दुःख, यातना आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रवास

Release Date: 2021 / Rated: U / 01hr 29min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Sahil Bhalla

वर्तमानकाळातली खिन्नता आणि नयनरम्य छायाचित्रण ही या चित्रपटाच्या यशामागचे कारण आहे. दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी शब्दांपेक्षा फक्त दृश्यांमधून रामजीची मनःस्थिती आणि त्याचे दुःख दाखवले आहे.

सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठीमध्ये तीव्र दुःख आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रवास हा विषय हाताळला आहे. जीवन आणि मृत्यू हे अटळ सत्य या चित्रपटात सांगितले आहे. 'आता आमोद सुनासी आले' या दि बा मोकाशी यांच्या लघु कथावर हा चित्रपट आधारित आहे.

वरवर पाहिलं तर ही रामजी (किशोर कदम) ची कथा आहे. आपला मुलगा नदीत वाहून गेला हे कळताच रामजीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याच्या घरी त्याची गर्भवती पत्नी आणि त्यांना अकाली झालेली एक मुलगी आहे. गावकऱ्यांच्या आयुष्यात कोणते दुःख असेल तर ते रामजींकडे त्याचा उपाय शोधायला येतात, परंतु आता रामजीच काही वयोवृद्ध गावकऱ्यांसह आपले दुःखाचे उत्तर शोधत आहे.

रामजी श्रध्दाळू वारकरी आहे. आपला मुलगा वारल्याच्या दुखासोबत त्याला विठ्ठलाचा खूप रागसुद्धा आला आहे.

किशोर कदम 

रामजी जास्त बोलत नाही परंतु त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्याला जे सांगायचं आहे ते तो सांगून जातो. यासाठी किशोर कदम यांची जितकी स्तुती करू तितकी कमी आहे.

दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी शब्दांपेक्षा फक्त दृश्यांमधून रामजीची मनःस्थिती आणि त्याचे दुःख दाखवले आहे. पण रामजीसोबत असलेले त्याचे इतर सहकाऱ्यांना त्याच्या दुःखाचा अंदाज येऊ शकेल का? ते त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकतात का?

संपूर्ण चित्रपटातील खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे फ्लॅशबॅक तंत्राचा वापर. फ्लॅशबॅकमधली दृश्ये घाईघाईत उरकली असे वाटायला लागते. वर्तमानकाळातली खिन्नता हे या चित्रपटाच्या यशामागचे कारण आहे. त्यासोबत मान्सूनचे नयनरम्य छायाचित्रपण चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.

मंद प्रकाशात हा चित्रपट शूट केला आहे त्यामुळे चित्रपटातली काही दृश्ये तुमच्या मेंदूवर कायमची छाप सोडून जातात. चित्रपटात पावसाचा वापर फक्त पार्श्वसंगीत म्हणूनच नाही तर गावात पसरलेली शोककळेचे रूपक म्हणूनदेखील केला आहे. तुम्ही देखील त्या पावसात त्यांच्यासोबत उभे आहेत असा तुम्हाला भास होईल.

सुमित्रा भावे 

याच दरम्यान एका नवीन जीवाचा जन्म होतो यामुळे रामजीचे जीवन बदलून जाते. यामुळे रामजीला जीवन-मृत्यू चे सत्य समजते. चित्रपटात मधेमधे संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या दाखवल्या आहेत.

किशोर कदम, मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी या सर्वांनी चित्रपटाच्या शेवटी धो-धो पावसात आपापल्या आवाजात गाणे गायले आहे. पावसाचा आवाज रेकॉर्ड करताना काहीतरी प्रोब्लेम झाल्यामुळे निर्मात्यांनी स्टुडिओमध्येच हा आवाज रेकॉर्ड करण्याचे ठरवले.

तीव्र दुःखाच्या यातना आणि नवीन जीवाला जन्म देताना होणाऱ्या यातना, या दोन परस्परविरोधी भावनांचा संगम या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो.

नवी दिल्लीला झालेल्या १४व्या हॅबिटॅट चित्रपट महोत्सवात मध्ये २४ मे २०१९ ला दिठीची स्क्रीनिंग करण्यात आली होती.

 

Related topics

SonyLIV

You might also like