{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

दे दे प्यार दे रिव्ह्यू – कॉमेडी आणि रोमान्स चे योग्य मिश्रण

Release Date: 17 May 2019 / Rated: U/A / 02hr 25min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

अकिव अली यांनी आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नात प्रौढ रोमान्स आणि एंटरटेनमेंट चे योग्य बॅलन्स असलेला चित्रपट बनवला आहे.

आता अभिनेते सुद्धा चित्रपटांमध्ये आपल्या खऱ्या वयाशी जुळणारी पात्र साकारू लागले आहेत. या चित्रपटात अजय देवगण वयाची पन्नाशी गाठलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत जे २६ वर्षाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडले आहेत.

नायक नायिकेच्या वयातील फरक हा चित्रपटातील महत्वाचा मुद्दा असला तरी चित्रपटात ब्रेकअप नंतर स्वतःला सावरत आयुष्याचा अर्थ शोधण्या वर भर दिला आहे.

आशिष (अजय देवगण) लंडनमध्ये राहणारा वयाची पन्नाशी गाठलेला एक इन्व्हेस्टर आहे. तो व त्याची बायको वेगळे झाले आहेत. एक दिवस त्याची भेट आयेशा (रकुल प्रीत सिंह) शी होते. आयेशा एक सुंदर तरुण इंजिनिअर आहे. दोघांचा स्वभाव खूप वेगळा आहे तरीही ते एकमेकांकडे आकर्षित होतात.

लंडनच्या रस्त्यांवर, बेडरूम मध्ये गाण्याच्या तालावर त्यांच्या रोमान्स ला सुरुवात होते. एका छोट्या ब्रेकअप नंतर त्यांच्या लक्षात येते की ते एकमेकां शिवाय राहू शकत नाहीत. म्हणून आशिष आपल्या गर्लफ्रेंडची कुटुंबाशी म्हणजेच विभक्त पत्नी आणि मुलं यांच्याशी ओळख करून देण्यासाठी तिला भारतात घेऊन येतो.

दोघांच्या वयातील तफावत हा मुद्दा वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून दाखवणे ही चांगली गोष्ट आहे परंतु व्यभिचारासारखी गंभीर घटना हसण्यावारी नेली आहे जे आपल्या मनाला पटत नाही.

ती फक्त पैशाच्या मोहापायी तुझ्या सोबत आहे, असं आशिष चा मित्र (जावेद जाफरी) त्याला सांगतो. आयेशा सुद्धा मान्य करते की त्या दोघांमध्ये विचारांचे फरक असणारच. माझा पहिला अनुभव हा तुझ्यासाठी दुसरा अनुभव असेल असं ती त्याला सांगते.

पण कथा जसजशी पुढे जाते तसतसे ते दोघेही एकमेकांच्या आणखी प्रेमात पडतात. प्रेम, शारीरिक आकर्षण त्याचे परिणाम हे विषय चित्रपटात सामंजस्याने हाताळले आहेत.

वेगळं राहणाऱ्या पती-पत्नी यांचे प्रेम आणि नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन प्रेमीयुगुलांचे प्रेम या मधला फरक पाहायला मजा येते.

लेखक-निर्माता लव्ह रंजन यांना त्यांच्या प्यार का पंचनामा फ्रँचाइज आणि सोनू के टिटू की स्वीटी (२०१८) मध्ये स्त्रीद्वेष हा प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा असल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला होता. परंतु या चित्रपटात मात्र तसे काही आढळत नाही. याउलट त्यांनी प्रेमभंग आणि रोमान्स अधिक विचारशीलपणे दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे.

तब्बू यांनी आपल्या अभिनयाची कमाल या चित्रपटात सुद्धा दाखवली आहे. वेगळं झाल्यानंतर त्यांच्या पात्राने स्वतःच्या हिम्मतीवर आपल्या मुलांना मोठं केलं आहे. देवगण सोबत त्यांनी चित्रपटात मॅच्युरिटी आणली आहे. पहिला अर्ध्यात रकुल प्रीत सिंह यांचा सतत बोलका स्वभाव विरुद्ध दुसऱ्या अर्ध्यात तब्बू यांची मॅच्युरिटी हे एक चांगलं  मिश्रण आहे.

दुसऱ्या हाफच्या एका सीनमध्ये तब्बू यांचा अनावर  झालेला राग पाहून आपल्याला त्यांच्या हैदर (२०१४) आणि अंधाधुन (२०१८) मधल्या भूमिकांची आठवण येते.

रकुल प्रीत यांनी सुद्धा छान अभिनय केला आहे. काही इमोशनल सीन्स मध्ये त्यांच्या अभिनयाची क्षमता दिसून येते तरीही त्यांच्या अभिनयतला उत्साह पाहून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तब्बू आणि रकुल प्रीत यांचे वाकयुद्ध पाहायला खूप मजा येते.

तब्बू आणि देवगण यांना जिमी शेरगीलची उत्तम साथ मिळाली आहे. शेरगील यांची भूमिका छोटी असली तरीही त्यात सुद्धा उत्कृष्ट विनोदाच्या टायमिंगमुळे ते आपली छाप सोडून जातात.
बलात्काराचे आरोप असलेल्या अलोकनाथ यांना पाहून मनात चीड निर्माण होते. पण हा एक वेगळा विषय आहे.

आयेशा ला आशिष च्या घरात जी वागणूक मिळते ते पाहता तिने लगेच त्याला सोडून निघून जायला हवे होते असे आपल्याला वाटत राहते. एकतर तिला कुटुंबात समाविष्ट करून घेत नाहीत, तिच्या प्रियकराचा मुलगाच तिच्याकडे आकर्षित झालेला असतो, पुन्हा आशिष ची पत्नी सुद्धा सतत आयेशा ला टोमणे मारत असते. अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आशिष आयेशाची आपल्या कुटुंबाशी ओळख त्याची गर्लफ्रेंड अशी न करून देता सेक्रेटरी म्हणून करून देतो.

आता ही एक वेगळी गोष्ट कि वयाची पन्नाशी गाठून सुद्धा उत्कृष्ट शरीरयष्टी असलेले आणि मोकळ्या वेळात बॉक्सिंग करणारे पुरुष पण फारच कमी असतील.

शेवटी अकिव अली सर्व नात्यांना एक चांगला शेवट देतात. आता हा शेवट आपल्या तर्कबुद्धीला थोडा विचित्र वाटत असेल, परंतु अल्बर्ट कामू या जगप्रसिद्ध तत्ववेत्यांनी म्हटलेच आहे कि एखादी गोष्ट विचित्र आहे म्हणजे आपण तिचा आनंद घेऊ शकत नाही असे होत नाही.

 

Related topics

You might also like