{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

भारत रिव्ह्यू – सलमान खान यांचा चित्रपट म्हणजे एक गोंधळलेला प्रयत्न

Release Date: 05 Jun 2019 / Rated: U/A / 02hr 47min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित भारत ना मनोरंजन करण्यात यशस्वी झालाय ना भारताचा इतिहास दाखवण्यात.

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा भारत कोरियन चित्रपट ओड टू माय फादर (२०१४) चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात १९४७ ते २०१० दरम्यान भारत (सलमान खान) आणि इंडियाचा एक देश म्हणून प्रवास पाहायला मिळेल, अस निर्मात्यांचा दावा होता.

१९४७ च्या फाळणीमध्ये ८ वर्षाचा भारत आपल्या वडील (जॅकी श्रॉफ), आई (सोनाली कुलकर्णी) आणि दोन बहिणींसह लाहोर वरून अमृतसरला येत असतो, परंतु गर्दीत त्याचे वडील आणि एक बहीण गुडिया मागेच राहतात.

मी येईपर्यंत कुटुंबाची काळजी घे असे भारतला वडिलांनी सांगितलेले असते आणि भारत आपल्या वडिलांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करतो.

रजनीश हेडाओ यांनी भारतसाठी वाखाणण्याजोगे प्रोडक्शन डिजाइन केले आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ ते २०१० हे सर्व काळ त्यांनी आपल्या उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइनमुळे अधिक वास्तववादी पद्धतीने उभे केले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की २०१० चा काळ उभा करणे सोप्पे असेल तर तसे नक्कीच नाही कारण गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतात अनेक बदल झाले आहेत.

फाळणी नंतर चित्रपटात भारतातल्या अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु तसे काही घडताना दिसत नाही. १९८३ चा विश्वचषक, पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू आणि १९९१ मध्ये भारताने जागतिकीकरणाचा केलेला स्वीकार या घटना वगळता चित्रपटात इतर कोणत्या गोष्टी दाखण्याचे टाळले आहे.

चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटाचा नायक भारत या दोन्ही गोष्टी एकसंध चालत आहेत असं वाटतच नाही. चित्रपटातील आपल्याला भावुक करणारी काही मोजकी दृश्ये वगळता बाकीचे कथानक भरकटलेलेच आहे असे वाटत राहते.

उदाहरणार्थ समुद्री डाकू जहाजावर हल्ला करतात असा एक सीन आहे, परंतु या सीनचा चित्रपटाच्या कथानकाशी नंतर काहीच संबंध नसतो.

पण हा सलमान खान यांचा चित्रपट आहे आणि त्यांच्या फॅन्सला या छोट्यामोठ्या त्रुटींमुळे काहीच फरक नाही. त्यांना फक्त सलमान खान त्यांचे मनोरंजन करताना पाहायचे असते आणि याचसाठी चित्रपटात काही प्रमाणात विनोदी आणि रोमँटिक दृश्ये सुद्धा दाखवली आहेत, परंतु त्यामुळे १६७ मिनटे तुमचे मनोरंजन होते असे मात्र नक्कीच नाही.

सलमान खान जवळजळ प्रत्येक फ्रेममध्ये दिसतात, पण ७० वर्षाच्या वृद्धाचा अभिनय करताना मात्र त्यांची अभिनयक्षमता स्पष्ट दिसून येते. मजेशीर गोष्ट म्हणजे ३० वर्षाचा भारत साकारताना सलमान खान ७० वर्षाच्या सलमान खानपेक्षा जास्त वृद्ध दिसतात. पन्नाशीत असताना भारत सांगतो की त्याने आयुष्यात एकदाही हिंसा केली नाही, परंतु वयाची सत्तरी गाठल्यानंतर मात्र तोच भारत काही गुंडाना अगदी सहज धोपटून काढतो.

इतर व्यक्तिरेखांचे वय आणि भारताच्या वयामधला फरकसुद्धा आपल्याला काहीवेळा गोंधळात टाकतो. सुरुवातीला दिशा पटनी ची व्यक्तिरेखा सलमान खान पेक्षा वयस्कर दाखवली आहे परंतु नंतरच्या काही सीन्समध्ये  सलमान खान दिशा पटनीपेक्षा वयस्कर दिसू लागतात.

कतरीना कैफने आपल्या इतर चित्रपटांतील अभिनयापेक्षा चांगला अभिनय केला आहे, परंतु त्यासुद्धा वृद्ध स्त्रीचा अभिनय करताना अवघडल्यासारख्या वाटतात. प्रियांका चोपड़ा यांनी ही  भूमिका अधिक उत्तम निभावली असती असे राहून राहून वाटते. सुनील ग्रोव्हर यांनी मित्राच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफ दोघांनीसुद्धा छान अभिनय केला आहे.

अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनामुळे चित्रपट पाहण्यालायक तरी झाला आहे. सुलतान (२०१६) आणि टायगर जिंदा है (२०१७) मधून त्यांनी आपले दिग्दर्शन कौशल्य दाखवले आहेच, परंतु कथानकच कमजोर असल्यामुळे या चित्रपटात त्यांच्या दिग्दर्शनाची जादू एवढी दिसून आली नाही. चित्रपटाची कथा त्यांनी स्वतःच लिहली असल्यामुळे याचा दोष सुद्धा त्यांनाच जातो.

 

Related topics

You might also like