{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

बंदिशाळा रिव्ह्यू – हा चित्रपट म्हणजे निव्वळ एक हास्यास्पद प्रयत्न

Release Date: 21 Jun 2019 / Rated: U/A / 02hr 30min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

मिलिंद लेले दिग्दर्शित या चित्रपटातील एकमेव चांगली गोष्ट म्हणजे मुक्ता बर्वे यांचा अभिनय.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपण याच दशकात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची कथा सांगणारे काही चित्रपट पहिले, दबंग (२०१०), सिंघम (२०११) ही त्यातलीच काही उदाहरणे. स्त्री-पुरुष समानता याचे प्रतीक म्हणून नंतर राणी मुखर्जी अभिनित मर्दानी (२०१४) आणि प्रियांका चोपड़ांची प्रमुख भूमिका असलेला जय गंगाजल (२०१६) असे चित्रपटसुद्धा आले.

आता याच ट्रेंडचा फायदा उचलत मराठीत सुद्धा बंदिशाळा नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे. ट्रेलर आणि टीजर वरून तरी हा त्याच पठडीतला चित्रपट असेल असे वाटले होते.
माधवी आपटे (मुक्ता बर्वे) ची नियुक्ती महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या जेलमध्ये होते. एकटा पोलीस अधिकारी सर्व गुंड आणि भ्रष्ट राजकारण्यां विरुद्ध लढा उभारतो हा नेहमीचा फॉर्म्युला या चित्रपटात पाहायला मिळत नाही.

माधवी आपटे खूप शिस्तप्रिय अधिकारी आहे आणि जेल मध्ये शिस्त ठेवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि याच मुळे जेल मधला एक अट्टल गुन्हेगार रघु (उमेश जगताप) आणि माधवी मध्ये शत्रुत्व निर्माण होते. शिस्तीचे पालन न केल्याबद्दल रघूला माधवी कडून मारदेखील खावा लागतो.

पण माधवीच्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी बाजू सुद्धा आहे. मूल न होऊ शकल्याने माधवी आपली मैत्रीण रुखसाना (हेमांगी कवी) हिची मुलगी दत्तक घेते. रुखसानाचा पती सतत दारू पिऊन तिला मारतो. एवढे कथानक पाहता आपल्याला वाटू लागते की हा उत्तम चित्रपट असू शकतो, परंतु तसे घडत मात्र नाही.

बंदिशाळा चित्रपटामध्ये अनके त्रुटी आहेत, पण आपण सध्या दोन मोठ्या त्रुटीं विषयी बोलणार आहोत. इंटरव्हल अगोदर चित्रपटाचे कथानक अतिशय संथ गतीने पुढे सरकत जाते. माधवी जेल मध्ये कडक शिस्त ठेवण्यासाठी सर्वच गुन्हेगारांवर लक्ष ठेवते आणि प्रसंगी कधीकधी आपल्या सिनियर (शरद पोंक्षे) चे ऑर्डर्स देखील पाळत नाही. पटकथा आणि एक्शन दृश्ये अगदी सुमार दर्जाची झाली नाही आहेत आणि याकडे जरी दुर्लक्ष करायचे ठरवले तरी हे सर्व दाखवण्यामागे नेमका उद्देश काय हेच आपल्याला कळत नाही.

जेलमधले गुन्हेगार आणि माधवीच्या त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न यापैकी कोणतीच गोष्ट दुसऱ्या हाफमध्ये दिसत नाही. चित्रपट अचानक बलात्कार पीडित आणि तिला न्याय मिळवून देण्याचा चाललेला प्रयत्न या वळणावर जातो.

बलात्कारासारखा गंभीर विषय इथे हास्यस्पदरित्या हाताळला आहे. नुकतंच आपण जजमेंट (२०१९) या मराठी चित्रपटात न्यायालयीन प्रक्रियेचे अगदी बालिश प्रस्तुतीकरण पाहिले होते. येथे विरोधी वकीलाच्या तोंडून आपल्याला अत्यंत किळसवाणे संवाद ऐकावे लागतात. वकील अक्षरशः पीडितेवर बलात्कार झाला याचा पुरावा असलेले मेडिकल रिपोर्ट्सच नाकारतो आणि न्यायाधीश सुद्धा त्या वकिलाला या बदल जाब विचारत नाही. काही सीन्स मध्ये न्यायाधीश पीडितेच्या वकिलाला अगदी विचित्र कारणांसाठी त्याचा पक्षच मांडू देत नाही.

कोर्टातल्या सीन्स व्यतिरिक्त दुसऱ्या हाफ मध्ये इतरही अनेक विचित्र गोष्टी घडतात ज्या पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.

चित्रपटातील एकमेव चांगली गोष्ट म्हणजे मुक्ता बर्वेंचा अभिनय, परंतु त्यासुद्धा काही सीन्स मध्ये अवघडल्यासारख्या वाटतात. मुक्ता बर्वेंनी हा चित्रपट का निवडला हे एक कोडेच आहे. पण या सर्वापेक्षा अधिक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ७ पुरस्कार मिळाले होते. यासाठी नक्कीच एकदा सर्व ज्युरींचं डोकं तपासायला हवं.

 

Related topics

You might also like