{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

बदला रिव्ह्यू – अपेक्षित वळणं घेणारी ही सूडाची गोष्ट मनोरंजक आहे

Release Date: 08 Mar 2019 / Rated: U/A / 01hr 58min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Sonal Pandya

पण सुजॉय घोष दिग्दर्शित ह्या थरारपटात सत्याच्या अनेक बाजू पाहून आपण अक्षरशः थकून जातो.

बदला नेहमी शांत चित्ताने घ्यावा असे म्हणतात. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेला सुजॉय घोष दिग्दर्शित बदला पाहताना ही म्हण आठवल्याशिवाय राहत नाही.

२०१६ चा स्पॅनिश चित्रपट कॉन्ट्राटिएम्पो (दि इनविजिबल गेस्ट) चा हा अधिकृत रीमेक आहे. बदला चित्रपटात मात्र प्रमुख पात्र स्त्रीचे आहे. मूळ चित्रपटात प्रमुख भूमिकेत पुरुष पात्र होता.

नैना सेठी या उदयोन्मुख उद्योगपतीच्या भूमिकेत तापसी पन्नू दिसतात. आपला प्रियकर अर्जुन (टोनी ल्युक) च्या खुनाच्या प्रमुख आरोपी असलेली नैना घरात नजरकैद आहे. ती निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी बादल गुप्ता या वकिलाची निवड करते.

अमिताभ बच्चन यांनी बादल गुप्ताची भूमिका साकारली आहे. चित्रपट या दोघां मध्ये होणाऱ्या संवादाभोवतीच फिरतो. ओरिजिनल चित्रपटात वकिलाची भूमिका स्त्री ने केली होती.

बादल गुप्ताला नैनाची बाजू ऐकून घेऊन योग्य बचाव सुचवायचं आहे तसेच दुसरा संशयित शोधायचा आहे. नैना भावुक तरी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे, तर बादलचा स्वतःच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे.

एका बंद खोलीत कोणतीही दुसरी व्यक्ती उपस्थित नसताना सुद्धा आपण मर्डर केला नाही हे नैनाचे म्हणणे पटत नाही. ऍगथा क्रिस्टीच्या पुस्तकात शोभून दिसेल अशी ही गोष्ट आहे. स्कॉटलंडच्या पर्वतां मध्ये एका शांत प्रदेशातले ग्लेनमोर हॉटेल ही ऍगथा क्रिस्टीच्या पुस्तकासाठी अगदी योग्य सेटिंग आहे.

पण इथे केस सोडवण्यासाठी हर्क्युल पोयरो नाही. इथे नैनाने पुरवलेल्या माहिती वरून आपल्यालाच सत्याचा शोध घायचा आहे. आणि कदाचित स्वतःला वाचवण्या साठी नैना काही महत्वाच्या गोष्टी लपवत सुद्धा असेल. त्यामुळे असत्या मधून सत्याचा शोध घ्यायची जबाबदारी गुप्ता आणि प्रेक्षकांवर असते.

घोष यांच्या कारकिर्दीतला सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे कहानी (२०१२). कहानी बरोबर या चित्रपटाची तुलना होणे साहजिक आहे कारण विद्या बागची प्रमाणेच नैना सेठी सुद्धा सत्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करते.

परंतु कहानी प्रमाणे या चित्रपटातील ट्विस्ट तुम्हाला आश्चर्यचकित करणार नाही. जर का तुम्ही काही मर्डर मिस्ट्री चित्रपट आणि क्राइम टीव्ही सिरीज पहिल्या असतील तर चित्रपटात पुढे काय होणार याचा तुम्हाला लगेच अंदाज येतो.

पण घोष लेखक दिग्दर्शक ओरिओल पाउलो यांच्या कथेचे भारतीय परीपेक्षात रूपांतर करण्यात यशस्वी झाले आहेत. सूड ही भावना भाषे पलीकडे असते. आपल्या प्रिय व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी कुटुंबाची होणारी तडफड सगळीकडे समानच असते. पण परदेशात राहणारी भारतीय वंशाची लोकं आपापसात हिंदीत बोलतात हे अनाकलनीय आहे.

चित्रपटात असे अनेक योगायोग आहेत. दुसऱ्या हाफ मध्ये कथानकावरची पकड ढिली होते. पन्नू आणि बच्चन पिंक (२०१६) नंतर पुन्हा वकील-पक्षकार च्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्ये सीन्स आणि त्यांच्यातले संवाद या मुळेच चित्रपट पाहण्यात मजा येते.

सत्याच्या शोधात असलेले बादल नैना बाबत साशंक आहेत. टोनी ल्युक, अमृता सिंह, मानव कौल, तन्वीर घनी यांची दृश्ये फ्लॅशबॅक मध्ये आहेत. न्यायासाठी लढणाऱ्या आईच्या भूमिकेत अमृता सिंह यांनी चांगला अभिनय केला आहे. मल्याळम अभिनेता टोनी ल्युकला हिंदी संवाद बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो. तसेच ब्रिटिश-एशियन अभिनेता घनी यांची सुद्धा निवड अयोग्य होती.

पण बदला पन्नू आणि बच्चन या दोघां भोवतीच फिरत असल्यामुळे काही वेळा दोघे ही आपल्या अभिनयाने चित्रपट तारून नेतात पण असे प्रत्येक वेळी घडत नाही. फर्स्ट हाफ मध्ये घटना पटापट घडतात, पण सेकंड हाफ प्रेडिक्टेबल झाला आहे.

शेवटच्या काही मिनिटां मध्ये बदला मूळ स्पॅनिश चित्रपटा पेक्षा वेगळ्या वेगळ्या वळणावर जातो. बदला मनोरंजक असला तरी प्रेडिक्टेबल आहे. चित्रपटात सत्याच्या अनेक बाजू पाहून आपण अक्षरशः थकून जातो.

 

Related topics

You might also like