{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

आनंदी गोपाळ रिव्ह्यू – या क्रांतिकारी विचारसरणीच्या जोडप्याची गोष्ट नक्की पहा

Release Date: 15 Feb 2019 / Rated: U / 02hr 24min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

आनंदी गोपाळ जोशी यांची भारताच्या पहिल्या डॉक्टर होण्याच्या प्रवासाची कथा शंभर वर्षाहून जुनी असली तरीही आजच्या ती तितकीच सुसंगत आहे.

YZ (२०१६) हा चित्रपट वगळल्यास दिग्दर्शक समीर विद्वंस यांचे टाइम प्लिज (२०१३), डबल सीट (२०१५) आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही (२०१७) हे तिन्ही चित्रपट विवाहित जोडप्या बद्दल होते.

त्यांचा नवीन चित्रपट हा भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनपट आहे. पण ही देखील एक विवाहित जोडप्याचीच कथा आहे. आणि तरीही विद्वंस यांनी दिग्दर्शित केलेल्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे.

त्यांचे अगोदरच्या चित्रपटात स्त्री आणि पुरुष यांना सामना कराव्या लागणाऱ्या आजच्या काळातले वयक्तिक प्रॉब्लेम्स दाखवले आहेत. आनंदी गोपाळ मध्ये मात्र शंभर वर्षांपूर्वी एका जोडप्याला कराव्या लागलेल्या सामाजिक संघर्षाची कथा आहे.

जेव्हा आनंदी (भाग्यश्री मिलिंद) लहान होत्या तेव्हा त्यांना याची कल्पना देखील नसेल की भविष्यात देशातल्या सर्व स्त्रियांना त्यांचा अभिमान वाटेल त्या असं काहीतरी करू शकतील.

त्या काळातल्या इतर स्त्रियां प्रमाणे त्यांना पण आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करावे असे सांगितले होते आणि त्यामुळेच फक्त आपल्या पती गोपाळराव जोशी (ललित प्रभाकर) यांच्या आज्ञेचे पालन म्हणून त्या शिकत होत्या. गोपाळरावांची आपल्या होणाऱ्या पत्नीकडून एकच अपेक्षा असते, ती म्हणजे तिने लग्नानंतरपण आपले शिक्षण चालू ठेवावे.

आनंदीला सुरुवातीला थोडा त्रास होतो आणि स्त्री शिक्षणा विरुद्ध असलेल्या रुढीवादी समाजाकडून गोपाळरावांवर देखील खूप टीका होते. हळूहळू आनंदीबाई देखील आपल्या पतीच्या या संघर्षात सामील होतात आणि एका अत्यंत दुःखद घटने नंतर त्या डॉक्टर व्हायचा निर्णय घेतात.

व्हॅलेंटाइन हा या चित्रपटाच्या रिलीजसाठी अगदी योग्य आठवडा आहे. हा एक टिपिकल रोमँटिक चित्रपट नाही. आणि चित्रपटात काही टिपिकल रोमॅंटिक सीन्स सुद्धा नाहीत. पण त्याची काही गरजच भासणार नाही कारण चित्रपटातल्या अगदी मोजक्याच सीन्स मधून या जोडप्यातले अथांग प्रेम दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.

गोपाळरावांच्या प्रेमा खातर आनंदी अमेरिकेस शिक्षण पूर्ण करण्यास जायला तयार होतात. एकमेकाला पाठवलेल्या पत्रातील संभाषणातून आपल्याला त्यांचे प्रेम किती गहिरे आहे याचा अंदाज येतो.

गोपाळरावांचे अत्यंत कठोर व्यक्तिमत्व जरी आजच्या काळाशी सुसंगत नसले तरी आपण हे विसरता कामा नये की ही कथा आणि गोपाळराव कोणत्या काळातले होते. पण त्यांचा उद्देश मात्र नक्कीच चांगला होता.

ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या दोघांमधली केमिस्ट्री आणि त्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे. ललित प्रभाकरांच्या अभिनय कारकिर्दी मधली ही सर्वात कठीण भूमिका होती. गोपाळरावांचा हट्टी आणि विचित्र स्वभाव देखील नैसर्गिक वाटतो. कधी कधी अत्यंत रागीट तर कधी खूप प्रेमळ आणि मनमिळावू असा त्यांचा स्वभाव ललित प्रभाकर यांनी यशस्वीपणे पडद्यावर दाखवला आहे.

भाग्यश्री मिलिंद यांनी देखील नाजूक मुलगी ते एक क्रांतिकारक महिला हा आपल्या पात्राचा प्रवास दाखवन्यात कोणतीच कमी ठेवली नाही. काही दृश्यांमध्ये त्या एकही शब्द न उच्चरता फक्त चेहऱ्यावरच्या हावभावातून खूप काही सांगून गेल्या आहेत.

आनंदी गोपाळ ही १९व्या शतकातली कथा आहे. प्रोडक्शन डिजाइन टीमने तो काळ उभा करण्यात कोणतीही कमी सोडली नाही. अगदी शंभर वर्षाहून जुनी कथा असून सुद्धा आजच्या काळास लागू पडते ही नक्कीच चांगली गोष्ट नाही. जेव्हा काही लोक धर्माचा आणि समाजाच्या रूढीपरंपरांचा दाखल देत जोशींनी आपले जीवन कसे जगावे हे शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमच्या लक्ष्यात येते की इतक्या दशका नंतर सुद्धा समाजतल्या काही गोष्टी अजून तशात आहेत.

आनंदी जोशी यांचा डॉक्टर होण्या पर्यंतचा प्रवास आणि दादासाहेब फाळके यांचा प्रवास यात बरेच साम्य आहे. त्यांना देखील समाजाच्या विरोधाचा सामना करत दुसऱ्या देशात जाऊन सिनेमाचे तंत्र शिकून घ्यावे लागले. त्यांच्यामूळे अनेकांनी सिनेमा क्षेत्रात येण्याचे धाडस केले.

इतक्या सर्व चांगल्या गोष्टीमध्ये एकच खटकणारी गोष्ट म्हणजे आनंदी जोशी यांना दुसऱ्या देशात वेगळ्या संस्कृती असलेल्या समाजात करावा लागलेला स्ट्रगल दाखवण्यात चित्रपट थोडा कमी पडतो.

पण या एका छोट्या त्रुटीमुळे एका क्रांतिकारी विचारसरणीला जन्म देणाऱ्या जोडप्याची कथा पाहण्याचे टाळू नका. चित्रपटाच्या एन्ड क्रेडिट मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय महिलांची नावे दाखवली आहेत.

 

Related topics

You might also like