{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

६६ सदाशिव रिव्ह्यू – हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटात उपहासात्मक पुणेकराच्या भूमिकेत मोहन जोशी मन जिंकतात

Release Date: 10 May 2019 / Rated: U / 02hr 18min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

आजकालच्या बहुतेक चित्रपटांप्रमाणे योगेश देशपांडे दिग्दर्शित ६६ सदाशिवसुद्धा दुसऱ्या हाफ मध्ये गडबडला.

भारतातल्या इतर शहरांप्रमाणे पुण्यातदेखील कालानुरूप अनेक बदल झाले आहेत. हे बदललेले आधुनिक पुणे आपण मुंबई-पुणे-मुंबई फ्रँचाइज, फास्टर फेणे (२०१७) यांसारख्या चित्रपटात पहिले आहे.

पुण्यात काही भागात अजूनदेखील जुन्या परंपरा पाळल्या जातात. पुण्याच्या अशाच एका जुन्या परंपरा पाळणाऱ्या परिसरात योगेश देशपांडे दिग्दर्शित ६६ सदाशिव चे कथानक घडते.

चित्रपटाची सुरवात गाण्याने होते. गाण्यामध्ये पुणेकरांची खास वैशिष्ट्ये म्हणजे पुणेरी पाट्या, दुपारच्या झोपेबद्दल असलेले विशेष प्रेम, सतत टोमणे मारण्याची आवड या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत.

प्रभाकर श्रीखंडे (मोहन जोशी) या आपल्या नायकामध्ये सुद्धा ही सर्व वैशिष्टये आहेत. प्रभाकर आपली पत्नी (वंदना गुप्ते) आणि मुलगी (अपूर्वा मोडक) यांच्यासह सदाशिव पेठेमध्ये राहतात. त्यांचा एक फोटो स्टुडिओसुद्धा आहे.

अस्सल पुणेरी असल्यामुळे सतत लोकांशी वाद घालणे, कटाक्षाने बोलणे हे गुण त्यांना अंगभूत आहेत. घरी आलेले देशपांडे परिवार (महेश मांजरेकर, आसावरी जोशी आणि योगेश देशपांडे) यांचा सुद्धा ते अपमान करतात.

त्यांच्या भांडकुदळ स्वभावासाठी ते सगळीकडे प्रसिद्ध असल्यामुळे प्रभाकर लोकांना वाद कसा घालावा याची शिकवणी द्यायला सुरु करतात. पण यामुळे त्यांची महापालिकेच्या स्थानिक नगरसेवक (प्रवीण तरडे) याच्याशी वाकडीक होते.

६६ सदाशिव पुण्याचे ते जग आपल्यासमोर उभे करण्यात यशस्वी झाला आहे. याचे श्रेय उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइनसोबत संवादलेखनाला सुद्धा जाते. चित्रपटातील अनेक भांडणाच्या दृश्यांमध्ये वापरलेले संवाद खूप विनोदी आहेत आणि तरीही तितकेच खरे वाटतात.

मोहन जोशींच्या सुंदर अभिनयाशिवाय हे शक्य नव्हते. मोहन जोशी अगदी सहज या भांडकुदळ पात्राच्या भूमिकेत घुसतात. कटाक्ष आणि अहंकार या दोघांमधली बारीक रेष त्यांनी बरोबर ओळखली आहे. त्यामुळे वाद घालतानासुद्धा ते कधीच अहंकारी वाटत नाहीत.

वंदना गुप्तेंनीसुद्धा त्यांना अगदी योग्य साथ दिली आहे. अपूर्वा मोडकच्या रूपात मराठी सिनेमासाठी अजून एक चांगली अभिनेत्री मिळाली आहे. भारतीय परंपरेचा आदर करणारी आधुनिक स्त्री अशी त्यांची भूमिका आहे आणि ती त्यांनी उत्तम निभावली आहे.

परंतु योगेश देशपांडे आणि मोडक यांची जोडी शोभत नाही कारण देशपांडे अपूर्वा मोडकपेक्षा वयाने खूप जास्त मोठे वाटतात. महेश मांजरेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत परंतु अगदी छोट्याश्या भूमिकेतसुद्धा त्यांनी आपली छाप सोडली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांच्या पात्राचे नाव मकरंद देशपांडे आहे.

कथानक खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळेच दिग्दर्शकावर मोठी जबाबदारी होती आणि इथेच चित्रपट फसला आहे. कोचिंग क्लास सुरु करायची कल्पना सुद्धा खूप घाईघाईमध्ये दाखवली आहे. पण हा तर एक छोटासा प्रॉब्लेम आहे.

या चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इंटरव्हल नंतर चित्रपटात जास्त काहीच घडत नाही. काही गरज नसलेले संवादसुद्धा चित्रपटात आहेत. क्लायमॅक्स येईपर्यंत चित्रपट पुन्हा इंटरेस्टिंग होईल अशी तुमची अपेक्षा असेल तर इथेदेखील चित्रपट तुमची निराशाच करतो. नायकाला कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करावा न लागता कथानक सहज पुढे जाते.

६६ सदाशिवमधला साधेपणा ही त्याची सगळ्यात जमेची बाजू आहे आणि त्यामुळेच शेवटपर्यंत तुम्ही चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट तुम्हाला त्या जुन्या दूरदर्शनवरच्या मालिकांची आठवण करून देतो.

 

Related topics

You might also like