{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

१५ ऑगस्ट रिव्ह्यू – स्वप्ननील जयकर दिग्दर्शित १५ ऑगस्ट चाळीतील जुन्या आठवणींना उजाळा देतो

Release Date: 29 Mar 2019 / 02hr 04min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

स्वप्ननील जयकरच्या १५ ऑगस्ट मध्ये चाळ भारताचे प्रतीकात्मक रूप म्हणून दाखवली आहे.

ये जो है जिंदगी आणि नुक्कड सारख्या सिरियल्स आपल्या आज देखील स्मरणात आहेत. माधुरी दीक्षित निर्मित १५ ऑगस्ट मध्ये स्वप्ननील जयकर ने मुंबईतली एक चाळ संपूर्ण भारताचे प्रतीकात्मक रूप म्हणून दाखवली आहे. चाळीतली वेगवेगळी व्यक्तिमत्व, त्यांच्यातले मतभेद, आपुलकी या सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवल्या आहेत.

गांधी चाळीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी चालू आहे. प्रत्येकासाठी या दिनाचे वेगळे महत्व आहे. मुलांना सुट्टी भेटते म्हणून स्वातंत्र्यदिनाची उत्सुकता आहे तर काही मोठ्या माणसांना आपली देशभक्ती दाखवायची ही एकमेव संधी असते म्हणून याची उत्सुकता आहे. मात्र दोन प्रेमी युगुलांचा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. ही सर्व अत्यंत भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्व, त्यांच्या कथा आणि त्यांचे प्रॉब्लेम्स चित्रपटात दाखवले आहेत.

राजू (राहुल पेठे) आणि जुई (मृण्मयी देशपांडे) या प्रेमी जोड्याभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. राजू एक आर्टिस्ट आहे आणि एक दिवस मोठ्या गॅलरी मध्ये त्याच्या पेंटिंग्स दाखवल्या जाव्यात असे स्वप्न तो उराशी बाळगून आहे. जुई साठी लग्नाची स्थळं येत आहेत.

चाळीतला एक छोटा मुलगा निनाद राजूचे झेंडा उभा करण्याच्या भोगद्यात पडलेलं ५ रुपयाचे नाणं काढून द्यायचा प्रयत्न करतोय हे पाहून चाळीतल्या दारुड्या पासून राजकारण्यापर्यंत सर्वच लोक वेगवेगळे उपाय सुचवायला लागतात, पण काहीच फायदा होत नाही.

जयकर आणि लेखक विनायक जोशी गांधी चाळ भारताचे प्रतीकात्मक रूप म्हणून आपल्यासमोर उभी करतात. भारता प्रमाणेच या चाळीत सुद्धा आपापसातले मतभेद आणि यासारखे खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण या सर्व गोष्टी अगदी विचारपूर्वक कशाचाही अतिरेक न करता संयतपणे दाखवल्या आहेत त्यामुळे ही कथा मनाला जास्त भावते.

चित्रपटाचा शेवट सुद्धा अगदी साधेपणाने केला आहे त्यामुळे तो मनाला आणखी भिडतो. खासकरून  चित्रपटाच्या शेवटी असलेले भाषणामुळे चित्रपट वास्तववादी झाला आहे.

राहुल पेठे, मृण्मयी देशपांडे आणि आदिनाथ कोठारे सर्वांनीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. प्रत्येक गोष्टीत काही ना काही मत असलेल्या व्यक्तीची भूमिका वैभव मांगलेंनी उत्तम वठवली आहे. विजय मौर्य, सतीश पुळेकर सारखे सह कलाकार सुद्धा टॉप फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक पात्र कथानकाला पुढे घेऊन जाण्यात मदत करते.

या सर्व गोष्टी कॅमेऱ्यात मनमोहक पद्धतीने टिपल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म वर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय योग्यच होता. जयकर आपण या अगोदर देखील पाहिलेली कथा एका वेगळ्या रूपात आजच्या समाजासमोर मांडतात. जुन्या मुंबईतील वेगवेगळ्या समाजात असणारा जिव्हाळा विसरत चाललेल्या आजच्या पिढीने हा चित्रपट एकदा पाहावा.

 

Related topics

You might also like