निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
गोदावरीचा जागतिक प्रेमियर वॅनकूवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये
मुंबई - 09 Sep 2021 13:02 IST
Updated : 03 Oct 2021 12:06 IST
Our Correspondent
निखिल महाजन यांचा गोदावरी चित्रपट ४ ऑक्टोबरला वॅनकूवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड प्रीमियरसाठी सज्ज आहे.
हा फेस्टिवल १ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. हा चित्रपट व्हर्चुयली संपूर्ण फेस्टिवल मध्ये दिसेल आणि प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या उपस्थितीत ४ आणि १० ऑक्टोबर रोजी कंटेम्पररी वर्ल्ड सिनेमा लाईनअपच्या माध्यमातून दाखवण्यात येईल.
गोदावरी मध्ये जितेंद्र जोशी मुख्य अभिनेता आहेत. या चित्रपटातून ते निर्माता म्हणून सुद्धा पदार्पण करत आहेत. जितेंद्र जोशी पिक्चर्स आणि ब्ल्यू ड्रॉप फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मोने, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव आणि गौरी नलावडे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
महाराष्ट्रातील नाशिक येथून गोदावरी नदी सुरु होते आणि राज्यातील पूर्वेकडील भागामध्ये ती वाहते. त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून बंगालच्या महासागराला जाऊन मिळते. गोदावरी हि निशिकांतची गोष्ट आहे. भाडे वसुली करणे हे त्याचं काम. त्याचं कुटुंब म्हणजे पिढीजात सावकार. आपल्या दैनंदिन आयुष्याला, साचलेपणाला निशिकांत (जोशी) कंटाळला आहे. तो आणि त्याचं कुटुंब कुठल्या प्रसंगातून जातात, ते म्हणजे हा चित्रपट.
'गोदावरी फक्त व्यक्तिगत द्वंद्व दाखवणारा चित्रपट नव्हे, तर हा निचरा होण्याचा अनुभव आहे. परंपरा, करुणा आणि स्वीकृती याची अनुभूती म्हणजे गोदावरी,' फेस्टिवलच्या अधिकृत निवेदनात म्हटले गेले आहे.
गोदावरी सोबत महाजन यांनी मराठी चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले आहे. याआधी त्यांनी बाजी (२०१५) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 'सहा वर्षांच्या अंतरानंतर सुद्धा महाजन गोदावरी सारख्या नाट्यमय विषयाकडे सहज वळले. हे एक निश्चित केलेले दिग्दर्शकीय सूत्र आणि दृष्टी आहे आणि हा त्यांचा आता पर्यंतचा अत्यंत वैयक्तिक असलेला चित्रपट आहे,' निवेदनात पुढे म्हटले आहे.
महाजन दिग्दर्शित बेताल (२०२०) हा शो नेटफ्लिक्स वर मागील वर्षी प्रदर्शित झाला.
Related topics
Other