तुषार घाडीगावकर दिग्दर्शित या शो मध्ये मीरा जगन्नाथ आणि स्नेहल साळुंखे मुख्य भूमिकेत आहेत.
तुझी माझी यारी ट्रेलर – प्लॅनेट मराठीच्या वेब-सिरीज मध्ये दोन तरुण मुलींच्या मैत्रीची गोष्ट
मुंबई - 05 Oct 2021 21:22 IST
Updated : 08 Oct 2021 13:01 IST
Keyur Seta
चित्रपट आणि वेब-सिरीज मध्ये आजच्या काळात घडणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. मात्र यापैकी बहुतांशी गोष्टी या पुरुषांच्या मैत्रीविषयी किंवा त्यांच्या संबंधांविषयी असतात.
प्लॅनेट मराठीची नवी सिरीज तुझी माझी यारी दोन तरुण मुलींच्या मैत्रीविषयीची गोष्ट सांगतेय. मीरा जगन्नाथ आणि स्नेहल साळुंखे यांनी या भूमिका वठवल्या आहेत. त्या फक्त जिवलग मैत्रिणी नसून एकमेकांच्या रूममेट्स आहेत, ज्या महाराष्ट्रातील एका शहरात राहताहेत.
तुझी माझी यारी मध्ये त्यांच्या मैत्रीतील तसेच वैयक्तिक आयुष्यातील चढ उतार दाखवण्यात आले आहेत. मीरा आणि साळुंखे या भूमिकेसाठी पूरक वाटताहेत आणि त्यांच्यातील मैत्री सहज झळकतेय. दोघांनीही आपल्या भूमिका समजून उमजून साकारलेल्या दिसतात.
हा ट्रेलर म्हणजे एक प्रकारे टीजरच आहे. यात बरेच दृश्य आणि तरीही अगदी छोटा असा हा ट्रेलर आहे. यातील जोरजोरात आदळणाऱ्या पार्श्वसंगीताने मात्र कुठलाही फायदा होताना दिसत नाही.
तुझी माझी यारी दिग्दर्शक तुषार घाडीगावकर यांचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. साईनाथ राजाध्यक्ष या शोचे निर्माते आहेत.
चार भागांची हि मालिका प्लॅनेट मराठीवर ७ ऑक्टोबर पासून दाखवण्यात येईल. ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्ही हि सिरीज पाहण्यास उत्सुक आहात का?
Related topics
Planet Marathi OTT