कोबाल्ट ब्ल्यू (२०२१) अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रीमियर होतोय. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी स्वतःच्याच कोबाल्ट ब्ल्यू नावाच्या कादंबरीला चित्रपटात रूपांतरित केले आहे. चित्रपटाची गोष्ट केरळ मध्ये घडते.
प्रतीक बब्बर चित्रपटात एका गूढ अनोळखी व्यक्तिरेखेत आहेत, जो पेईंग गेस्ट म्हणून राहायला आलाय आणि त्याच्या येण्याने बहीण-भावाचे आयुष्यच बदलून जाते. निलय मेहेंदळे आणि अंजली शिवरामन यांनी या भूमिका साकारल्या आहेत. दोघेही बहीण-भाऊ याच गूढ व्यक्तिरेखेकडे आकर्षिले जातात. या व्यक्तिरेखेच्या येण्याने त्यांच्या आयुष्याला मात्र खरंच एक अस्तित्व प्राप्त होतं, मात्र त्याच्यामुळेच दोघांचे संबंध सुद्धा पूर्ववत राहिले नाहीत.
कोबाल्ट ब्ल्यूचे दृश्य आणि रंगसंगती स्वप्नांसारखी आणि उदासीनतेने भरलेली वाटते, कारण बहीण-भावाची मनं तुटलेली आहेत. चित्रपट १९९०च्या दशकातील काळ दाखवतोय आणि रंगसंगतीमध्ये निळा रंग प्रकर्षाने जाणवतोय.
बब्बरची भूमिका रोचक आहे आणि त्यांनी ती संयतपणे साकारलेली दिसतेय. मेहेंदळे स्वतःच्याच विचारात गर्क अशा वेदनेने घायाळ कवीच्या रूपात छान वाटतात.
ओपन एयर फिल्म्स निर्मित कोबाल्ट ब्ल्यू नेटफ्लिक्स वर ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात?