भद्रकाली असे या चित्रपटाचे नाव आहे आणि दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. हा चित्रपट मराठा फौजेच्या सेनापती उमाबाई दाभाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
प्रसाद ओक यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट
मुंबई - 07 Jun 2021 17:49 IST
Updated : 24 Jun 2021 13:44 IST
Suyog Zore
इतिहासात हरवलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी आजच्या मराठी चित्रपटकर्त्यांना सारख्या खुणावत आहेत. सरसेनापती हंबीरराव आणि छत्रपती ताराराणी या चित्रपटानंतर मराठा लढवय्यी उमाबाई दाभाडे यांच्या आयुष्यावर भद्रकाली या नावाने चित्रपट बनतोय.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहेत, ज्यांनी याआधी हिरकणी (२०१९) हा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ओक यांनी इंस्टाग्रामवर या चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचा टीजर सुद्धा जोडला.
नाशिक मध्ये जन्मलेल्या उमाबाई दाभाडे यांचे लग्न खंडेराव दाभाडे यांच्याशी झाले. खंडेराव छत्रपती शाहू यांच्या कार्यकाळात गुजरात येथे मराठा सेनेचे सेनापती होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर उमाबाईंनी बलाढ्य पेशव्यांना आवाहन केले.
भद्रकालीची कथा आणि पटकथा दिग्पाल लांजेकर यांची आहे. यापूर्वी त्यांनी फर्जंद (२०१८) आणि फत्तेशिकस्त (२०१९) यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
चित्रपटाचे संगीत लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल यांचे आहे. ओक यांचे दिग्दर्शन असलेल्या चंद्रमुखीचे संगीत सुद्धा अजय-अतुलच करत आहेत. पुनीत बालन स्टुडिओज भद्रकालीचे निर्माते आहेत. चित्रपटातील कलाकारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
Related topics