समांतर या एमएक्स प्लेयरवरील मराठी वेब-सिरीजच्या पहिल्या सीजन मध्ये कुमार महाजन (स्वप्नील जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) या दोघांचे आयुष्य ज्या विचित्र योगायोगाने जोडलेले आहे, त्याभोवती कथा गुंफलेली होती. सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमार महाजनचा भविष्यकाळ ठरतोय, असे यात दाखवण्यात आले होते.
यात असे हि दाखवण्यात आले होते कि कुमारला सुदर्शनने लिहिलेली डायरी मिळते ज्यात सुदर्शनने त्याच्या गत आयुष्यातील गोष्टींबद्दल लिहून ठेवले आहे. मात्र, त्याला एका वेळेस फक्त एका दिवसाबद्दलच वाचायची परवानगी देण्यात आली आहे.
ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे कुमार पत्नी निमा (तेजस्विनी पंडित) आणि मुली सोबत आनंदी आयुष्य जगतोय. त्याला विश्वास आहे कि आता आयुष्यात काहीही चुकू शकत नाही. मात्र भविष्यवाणीनुसार एक गूढ स्त्री (सई ताम्हणकर) त्याच्या आयुष्यात येते. कुमारचं आयुष्य आता उतरणीला लागतं आणि एका गुन्ह्याशी संबंधित असल्याच्या आरोपावरून त्याला पोलिसांद्वारे अटकही केली जाते. पण भविष्यावर विसावणारा कुमार नाही.
ट्रेलरवरून हे स्पष्ट आहे कि दुसरा सीजन आधीच्या सीजन पेक्षा भव्य असणार आहे. यावेळेस नाट्य अधिक गहिरं आणि नव्या व्यक्तिरेखांसोबत अधिक रोमांचक असेल. पहिल्या सिजनचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे होते, तर या सीजनला समीर विद्वांस यांचे दिग्दर्शन लाभले आहे.
जोशी प्रभावी वाटतात, तर भारद्वाज यांना ग्रे व्यक्तिरेखेत बघताना उत्सुकता आणखीनच वाढते. भारद्वाज यांनी इतर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या असल्या तरी सुद्धा बी आर चोप्रांच्या महाभारत मालिकेतील कृष्णाच्या भूमिकेसाठीच त्यांना अधिक ओळखले जाते.
समांतर (सीजन २) एमएक्स प्लेयर वर १ जुलै पासून उलपब्ध असेल. ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्ही हि सिरीज बघण्यास उत्सुक आहात का?