निवडक कल्पना आणि संहितांचे मूल्यमापन केले जाईल आणि झिंगलीनच्या टीम कडून वेब-सिरीज निर्मितीसाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाईल. झिंगलीन यूएफओ मुव्हीजचे शॉर्ट व्हिडीओ ऍप आहे.
तुमची गोष्ट किंवा कल्पना तयार आहे? पॉकेटवालाच्या स्पर्धेमधून तुमच्या कल्पनेवर वेब-सिरीज बनवण्याची संधी
मुंबई - 02 Jun 2021 10:40 IST
Updated : 04 Jun 2021 13:50 IST
Our Correspondent
कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे जी बंधनं आली, त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सची नवी पिढी समोर आली आहे. हे क्रिएटर्स त्यांच्या मजेदार कल्पना समोर आणताना मोठ्या बजेटवर अवलंबून नसतात. हे नव्या भारताचे कंटेंट क्रिएटर्स आहेत, ज्यांच्याकडे फक्त एक मोबाईल आणि एक कल्पना असते.
पॉकेटवाला हे ग्रामीण आणि निम-शहरी भागांकरिता असलेले ऑफलाईन व्हिडीओ-शेयरिंग ऍप आहे. पॉकेटवाला आता या क्रिएटर्सच्या कौशल्याला चालना देण्यासाठी पहिली पॉकेटवाला वेब सिरीज आयडिया कॉंटेस्ट घेऊन आली आहे.
या स्पर्धेमधून सहा विजेत्यांना निवडण्यात येईल. त्यांच्या मूळ गोष्टींवर (कल्पना किंवा संहिता) वेब-सिरीज बनवण्याची संधी त्यांना मिळणार आहे, जी झिंगलीन वर दाखवण्यात येईल. झिंगलीन भारतातील सर्वात मोठे डिजिटल मुव्ही डिस्ट्रिब्युशन नेटवर्क यूएफओ मुव्हीजचे शॉर्ट व्हिडीओ ऍप आहे.
इच्छुक प्रतिस्पर्धी त्यांच्या नव्या कल्पना तसेच तयार संहिता पाठवू शकतात.
सहा विजेत्यांच्या कल्पना किंवा संहितांना (तीन सर्वोत्तम कल्पना आणि तीन सर्वोत्तम संहिता) वेब-सिरीजमध्ये रूपांतरित होण्याची संधी मिळेल आणि त्यांना त्यांचं क्रेडिट सुद्धा मिळेल. या वेब-सिरीज झिंगलीन ऍप वर प्रदर्शित होतील.
एका उमेदवाराने किती कल्पना किंवा संहिता पाठवाव्यात यावर कुठलेही बंधन नाही. फक्त प्रत्येक कल्पना किंवा संहितेसाठी वेगळी प्रवेशिका आवश्यक असेल. प्रवेशिका हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच स्वीकारल्या जातील.
या स्पर्द्धेत भाग घेण्यासाठी पॉकेटवाला तर्फे गोष्टीची संकल्पना किंवा कल्पना असेल तर रु५५० आणि तयार संहितेसाठी रु८८० एवढे प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे.
निवडक कल्पना किंवा संहितांची पडताळणी करून झिंगलीनच्या टीमच्या वतीने वेब-सिरीज निर्मितीसाठी योग्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाईल.
पॉकेटवाला वेब-सिरीज आयडिया कॉंटेस्ट १८ वर्षांवरील भारतीय नागरिकांसाठी जुलै २०२१ पर्यंत सुरु असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Related topics
Pocketwala Web Series Idea Contest