एमएक्स प्लेयर वरील आणि काय हवं? च्या पहिल्या सीजनमध्ये जुई (प्रिया बापट) आणि साकेत (उमेश कामत) यांचे नवीनच लग्न झालेले दाखवले होते. दुसऱ्या सीजनमध्ये लग्नाचे तीन वर्ष पूर्ण झाल्याचा काळ दाखवण्यात आला होता.
आता तिसऱ्या सीजनमध्ये लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत. ट्रेलरमधून हे कळतंय कि जुई आणि साकेत लवकरच आई-बाबा होणार आहेत.
प्रोमोमध्ये दोघे छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. अर्थात तोच या शोचा यूएसपी देखील आहे.
प्रोमोमध्ये काही मजेदार गोष्टी सुद्धा दिसत आहेत. एका ठिकाणी दोघांमध्ये नवीन काय बोलणं होऊ शकेल, याबद्दल ते बोलताहेत. अर्थात शोचा एकूण हलका फुलका अंदाज लक्षात ठेवूनच ते मांडण्यात आलंय.
शो जरी अपार्टमेंटमध्ये घडत असला, तरी दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी कलरफुल दृश्य दाखवलेली आहेत.
वास्तविक जीवनात पती-पत्नी असलेले कामत आणि बापट आपल्या व्यक्तिरेखेत योग्य वाटतात. या आधीच्या सीजनप्रमाणेच त्यांच्यातील स्वाभाविकता सहज लक्षात येते.
आणि काय हवं? (सीजन ३) एमएक्स प्लेयर वर ६ ऑगस्ट पासून दाखवण्यात येतोय. ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्ही हा शो बघण्यास उत्सुक आहात का?