सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात जातीयता, न्यायप्रक्रिया आणि दडपशाही या विषयांना हात घालण्यात आला आहे.
अमोल पालेकर, बरुण सोबती, रिंकू राजगुरू झी५ च्या २०० मध्ये
मुंबई - 27 Jul 2021 16:00 IST
Updated : 30 Jul 2021 19:36 IST
Our Correspondent
अमोल पालेकर, बरुण सोबती, रिंकू राजगुरू, साहिल खट्टर, सलोनी बत्रा आणि उपेंद्र लिमये अशी मोठी स्टार कास्ट झी५ ओरिजिनल चित्रपट २०० मध्ये दिसणार आहे.
सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यूडली फिल्म्स करत आहे. यूडली फिल्म्स सारेगामा इंडीया लिमिटेडची चित्रपट निर्मिती संस्था आहे.
इंस्टाग्रामवर टाकलेल्या मोशन पोस्टर मध्ये हातोडा असलेले अनेक हात दिसतात आणि त्यातलाच एक हातोडा हातातील बेड्या तोडताना दिसतो.
निर्मात्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून चित्रपटाविषयी म्हटले आहे, "दलित महिलांना ज्या दडपशाही आणि अन्यायाला सामोरं जावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जे मोठं पाऊल उचलावं लागतं, अशा एकूण परिस्थितीवर प्रकाश टाकणारी चित्तथरारक गोष्ट म्हणजे २०० होय."
यूडलीने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय का घेतला हे समजावून सांगताना सारेगामाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ आनंद कुमार म्हणाले, "२०० ची गोष्ट खूप दमदार आहे, ती तितकीच खरी आणि सुसंगत आहे आणि ती सांगणं महत्वाचं आहे.
"आम्ही नेहमी अशाच चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात समाजासाठी तातडीने आणि तळमळीने काही तरी सांगण्यासारखं आहे. एका सत्य घटनेला धरून या चित्रपटात जातीयता आणि न्याय प्रक्रियेची तपासणी आणि दडपशाही या सगळ्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपट जेवढे उत्तरं देत नाही, तेवढे तो प्रश्न विचारतोय आणि आम्ही आशा करतो कि यामुळे या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा सुरु होतील."
झी५ इंडीयाच्या हिंदी ओरिजिनल्सच्या मुख्य, निमिषा पांडे, म्हणाल्या, "झी५ चा नेहमीच या गोष्टीवर विश्वास राहिला आहे कि कॉन्टेन्टची ताकद समाजात चांगले बदल घडवून आणू शकते. २०० हि एक अशीच ताकदीची गोष्ट आहे. अशा गोष्टींना प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या जगासमोर येऊ शकतील आणि अजूनही अस्तित्वात असलेल्या भयंकर वास्तवाला जगासमोर मांडू शकतील.
"आम्ही सारेगामा आणि यूडली फिल्म्स सोबत एकत्र येत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि आशा करतो कि हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल आणि आवश्यक चर्चा यामुळे सुरु होतील."
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०० लवकरच झी५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
Related topics
Zee5