News Marathi

पर्ण पेठे, सिद्धार्थ चांदेकर यांची वेब-सिरीज अधांतरी हंगामा प्ले आणि एमएक्स प्लेयरवर एकाच वेळेस प्रदर्शित

या रोमँटिक कॉमेडी सिरीज मध्ये प्रेमी युगलाची एक छोटी रोमँटिक सफर बनते २१ दिवसांचा एकत्र राहण्याचा अनुभव.

पर्ण पेठे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मराठी वेब-सिरीज अधांतरी एकाच वेळेस हंगामा प्ले आणि एमएक्स प्लेयर वर प्रदर्शित झाली आहे. हि सिरीज हिंदी मध्ये सुद्धा डब करण्यात आली आहे.

मुकुल (चांदेकर) आणि मुग्धा (पेठे) वेगवेगळ्या शहरात राहतात. ते लोणावळ्यात एक वीकेंड एकत्र घालवण्याचा निर्णय घेतात. मात्र त्यांचं हे छोटसं प्लॅन २१ दिवसांमध्ये बदलतं, कारण सरकार त्याच वेळी लॉकडाऊनची घोषणा करते. काही दिवस एकत्र घालवल्यानंतर दोघे एकमेकांसाठी किती पूरक आहेत याविषयावर ते एकमेकांना प्रश्न करू लागतात.

नेटफ्लिक्स इंडिया वरील होम स्टोरीज (२०२०) या अँथॅलॉजी मधील विल यु बी माय क्वारंटाईन हि शॉर्ट फिल्म सुद्धा याच गोष्टीवर आधारित होती. या शॉर्ट फिल्ममध्ये इमाद शाह आणि सबा आझाद यांनी भूमिका साकारल्या होत्या.

अधांतरी मध्ये विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्या सुद्धा छोट्या मात्र महत्वपूर्ण भूमिका आहेत. अधांतरीचे दिग्दर्शन जीत अशोक यांनी केले आहे आणि गणराज असोसिएशन्स यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे.