{ Page-Title / Story-Title }

News Marathi

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करणार, १४३ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला निर्णय

Read in: English


दिग्दर्शक योगेश भोसले यांचा या चित्रपटासोबतच मंगलाष्टक रिटर्न्स या नावाने आणखी एक चित्रपट निर्मिती प्रक्रियेमध्ये आहे.

Our Correspondent

यावर्षी एप्रिल महिन्यात दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या १४३ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केले आहे. चित्रपटाची निर्मिती शारदा फिल्म प्रॉडक्शन आणि वीरकुमार शाह यांनी संयुक्तपणे केली आहे.

पोस्टरमध्ये आकृती सदृश एक मोटारसायकल आणि सायकल एकमेकांसमोर दिसताहेत. हि दोन वाहनं चित्रपटात महत्वपूर्ण आहेत, असं यावरून लक्षात येतं. गुलाबी अवकाश पोस्टरला अधिक आकर्षक करत आहे.

निर्मात्यांद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलंय, "१४३ या चित्रपटाचं शूटिंग दक्षिण भारतीय चित्रपटांसारखं करण्यात आलंय आणि मराठी चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे."

चित्रपटाच्या कलाकारांबद्दल अजून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र वृषभ शाह यात नकारात्मक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मजेशीर बाब म्हणजे दिग्दर्शक भोसले यांच्या मंगलाष्टक रिटर्न्स या दुसऱ्या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आहेत. मंगलाष्टक रिटर्न्स मध्ये श्वेता खरात मुख्य नायिका आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

निर्मात्यांनी असं म्हटलंय कि कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर चित्रपटगृहे बंद होती आणि त्यामुळे ते चित्रपट प्रदर्शित करू शकले नाहीत. जेव्हा महाराष्ट्रात चित्रपटगृहांना परवानगी मिळेल, तेव्हाच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं.

Related topics