या पुस्तकावर आधारित हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी आचार्य अत्रे यांनी शयामची आई (१९५३) याच नावाने या पुस्तकावर आधारित चित्रपट केला होता. भारताच्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारात या चित्रपटाला सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आले होते.
साने गुरुजींच्या श्यामची आईवर सुजय डहाके यांचा चित्रपट, पहा पोस्टर
मुंबई - 16 Aug 2021 14:30 IST
Updated : 19 Aug 2021 18:32 IST
Our Correspondent
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी यांची आत्मचरित्रपर कादंबरी शयामची आई यावर हा चित्रपट आधारित असेल.
चित्रपटाचे शीर्षक कादंबरीच्या नावानेच ठेवले असून पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.
डहाके यांनी फेसबुकवर चित्रपटाचे पहिले पोस्टर टाकले आणि याबाबतची माहिती दिली.
डहाके यांनी लिहिले, "सुरुवात झालीय. महत्वकांक्षी प्रोजेक्ट. पाच वर्ष यावर काम करत शेवटी हा प्रोजेक्ट मी सुरु करू शकलोय. अधिक माहितीसाठी या पेजकडे लक्ष ठेवा. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम देत राहा."
हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीत शूट केला जाईल. १९१२ ते १९४७ हा काळ या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई (१९५३) नंतर या कादंबरीवर हा दुसरा चित्रपट बनतोय. अत्रेंच्या चित्रपटाला १९५४च्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्ण कमळ मिळाले होते.
शाळा (२०१२) या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच डहाके यांच्या डोक्यात श्यामची आई वर चित्रपट बनवण्याचा विचार सुरु होता. मधल्या काळात त्यांनी आजोबा (२०१४), फुंतरू (२०१५) आणि केसरी (२०२०) हे चित्रपट बनवले. इतर चित्रपटांवर काम करत असताना सुद्धा त्यांनी या प्रोजेक्टवर काम करणे सुरु ठेवले आणि एवढ्या वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी अखेर हा चित्रपट लाँच करण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटाची कास्टिंग ऑडिशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. श्यामची आईची निर्मिती पुणे फिल्म कंपनी या बॅनरखाली अमृता अरुण राव करत आहेत.
Related topics