नरेंद्र फिरोदिया यांचे प्रादेशिक भाषेतील प्लॅटफॉर्म लेट्सअपने खास रे टीव्ही या युट्युब चॅनलमध्ये मोठी भागीदारी मिळवली आहे.
लेट्सअप हे एक हायपरलोकल इंफोटेंमेंट ऍप आहे जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मनोरंजन आणि क्रीडा विभागाच्या बातम्या देत असते. या ऍपचे ३० लाखाहून अधिक सब्सक्राईबर्स आहेत.
खास रे टीव्ही ही एक डिजिटल मनोरंजन कंपनी आहे. विनोदी व्हिडीओज आणि गाण्यांच्या निर्मितीसाठी ही कंपनी विशेष ओळखली जाते. 'उसाचा रस' आणि पंजाबी गाणे 'ब्राऊन मुंडे'वर बेतलेले मराठी गाणे 'गावरान मुंडे' या त्यांच्या सध्याच्या युट्युब वरील गाण्यांना अनुक्रमे ४ लाख पेक्षा अधिक आणि २० लाख पेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.
याशिवाय अनेक मराठी स्टार्स सोबत त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी शोज केले आहेत. अमेय वाघ, सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी यांनी सुद्धा खास रे टीव्ही सोबत व्हिडीओज केले आहेत. बार्शी, सोलापूर, येथील संजय श्रीधर यांनी २०१७ मध्ये खास रे टीव्ही सुरु केले होते.
फिरोदिया यांनी म्हटले, "या काळात युट्युब चॅनल्स खूप लोकप्रिय झाले आहेत आणि मला वाटतं खास रे टीव्हीमध्ये अग्रणी चॅनल बनण्याची क्षमता आहे. सामान्य जनतेसाठी उत्तम दर्जाचे कंटेंट बनवणे हा माझा उद्देश आहे. या भागीदारीसह मी त्यांना योग्य व्यवस्था पुरवणार आहे आणि चांगला कंटेंट बनवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून सोबत राहणार आहे."
काही महिन्यांपूर्वी फिरोदिया यांनी नवीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म लेट्सफ्लिक्स मराठीची घोषणा केली होती ज्यामध्ये ओरिजिनल्स, चित्रपट, लघुपट आणि माहितीपट उपलब्ध असतील.