८१ वर्षीय नांदलस्कर यांना श्वसनाच्या त्रासामुळे दोन आठवड्या आधी ठाणे येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते.
कोरोना व्हायरस अपडेट – जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोविड मुळे निधन
मुंबई - 20 Apr 2021 19:15 IST
Updated : 23 Apr 2021 12:09 IST
Our Correspondent
वास्तव (१९९९), सिंघम (२०११) आणि सिम्बा (२०१८) सारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवार २० एप्रिल रोजी कोविड-१९ मुळे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
दोन आठवड्यांपूर्वी त्यांना ठाणे येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते.
नांदलस्कर यांचे नातू अनिश यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले कि किशोर नांदलस्कर यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता आणि कोविड केंद्रात दाखल करण्यापूर्वी ते बोलत होते. हळू हळू त्यांची ऑक्सिजनची पातळी खाली येत गेली.
मराठी चित्रपट आणि मालिकांमधील जेष्ठ कलावंत असलेले नांदलस्कर यांनी ३० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच ४० हुन अधिक नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
मराठी चित्रपटांमध्ये इना मीना डिका (१९८९) हा त्यांचा पहिला. त्यांच्या इतर महत्वपूर्ण चित्रपटांमध्ये शेजारी शेजारी (१९९०), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), शेम टू शेम (१९९३) आणि लपंडाव (१९९३) यांचा उल्लेख करता येईल.
महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव चित्रपटांमधून त्यांची हिंदी चित्रपटांची कारकीर्द सुरु झाली. त्यांनतर कुरुक्षेत्र (२०००), हत्या (२००२) आणि खाकी (२००४) अशा चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या.
Related topics
Coronavirus