{ Page-Title / Story-Title }

News Marathi

चोरीचा मामला ट्रेलर – एका घरात फसलेल्या चित्र-विचित्र पात्रांची वेडी कॉमेडी

Read in: English


लेखक-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाच्या शैली विषयीची उरली सुरली शंका हि मिटते.

Suyog Zore

जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग अभिनित चोरीचा मामला (२०२०) हि पूर्णपणे एक कॉमेडी ऑफ एरर्स ची गोष्ट आहे. या शैलीशी पूर्णपणे प्रामाणिक राहत ट्रेलरमध्ये अनेक मजेदार क्षण बघायला मिळतात.

जितेंद्र जोशी इथे एक चोराच्या भूमिकेत आहेत, जो एका घरात घुसतो मात्र त्याला हे माहित नसतं कि त्या घरात आधीच दोन माणसं आहेत, जे त्याच्यापेक्षाही अधिक विक्षिप्त आहेत. अमृता खानविलकर हेमंत ढोमेंच्या पात्राला रिझवण्याचा प्रयत्न करताहेत, पण जितेंद्र जोशींच्या येण्यामुळे तिचा प्लॅनचा बट्याबोळ होतो. 

अनिकेत विश्वासराव एका त्रासलेल्या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत आहेत, जो डबल ड्युटीला कंटाळलाय कारण त्याला कुठलाही कौतुक किंवा प्रमोशन मिळत नसतं. तो एका चोरी गेलेल्या लिओ नावाच्या कुत्र्याचा शोध घेतोय. तेंडुलकर आऊट (२०१३) आणि पोश्टर बॉईज (२०१४) सारख्या चित्रपटांमधून त्यांचा विनोदी अभिनय यापूर्वी बघायला मिळाला होता.

जितेंद्र जोशी या शैलीमधले अनुभवी नट आहेत आणि साधं दिसून विचित्र पात्र रंगवणं हे त्यांना उत्तम जमतं, हे इथे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय.

या ट्रेलरमध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे खानविलकर आणि जोग. खानविलकर ग्लॅमरस तर दिसत आहेतच, पण त्याच आश्वासकतेने त्या विनोदी दृश्यात काय कमाल करतात, ते बघायला हवे.

प्रियदर्शन जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मस्का (२०१८) नंतर हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट.

चित्रपटाच्या शैलीविषयी जर कुणाला कुठलीही शंका यापूर्वी होती, तर या ट्रेलरमुळे या स्लॅपस्टिक कॉमेडीचा पुरेपूर अंदाज प्रत्येकाला आलाच असेल.

चोरीचा मामला ३१ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होतोय. ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा चित्रपट बघायला आवडेल का?

Related topics