News Hindi

तख्त टीजर – करण जोहर यांचा मुघलपट २४ डिसेंबर २०२१ ला होईल प्रदर्शित

मोकळं मुघल सिंहासन दाखवत करण जोहर यांनी हा चित्रपट एक भव्य दिव्य अनुभव असेल याची ग्वाही या टीजर द्वारे दिली आहे.

निर्माता म्हणून बराच काळ काम करत असले तरी करण जोहर दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बऱ्याच काळानंतर परतले आहेत. त्यांच्या आगामी मुघलपट तख्तचा टीजर शनिवारी १ फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आला.

टीजर मध्ये रणवीर सिंग आणि विकी कौशल यांचा आवाज ऐकायला मिळतोय. चित्रपटात रणवीर सिंग औरंगजेब आणि विकी कौशल दारा सुखोची भूमिका साकारत आहेत. राजमहालात सिंहासनाचं दृश्य या टीजर मध्ये बघायला मिळतं. टीजर वरून चित्रपट भव्य असेल यात शंकाच नाही.

या चित्रपटात आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट २४ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित होतोय. यापूर्वी अशी चर्चा होती कि हा चित्रपट २०२० च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

करण जोहर द्वारा दिग्दर्शित तख्त मध्ये औरंगजेब आणि दारा सुखो यांच्यामधला राज सिंहासनाचा संघर्ष दर्शवण्यात येणार आहे. या मुख्य भूमिका क्रमशः रणवीर सिंग आणि विकी कौशल साकारतील.

धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित तख्तची शूटिंग मार्च पासून सुरु होणार आहे. राजस्थान आणि युरोप मध्ये मुघल कालीन सेट लावून या भव्य चित्रपटाचं शूट केलं जाईल.