News Hindi

गिल्टी ट्रेलर – सत्य आणि दृष्टिकोण या मध्ये फसलंय कियारा अडवाणी यांचं पात्र

रुची नारायण दिग्दर्शित हे नेटफ्लिक्स ओरिजिनल ६ मार्च २०२० पासून बघता येईल.

सत्याच्या विविध दृष्टिकोणावर आधारित राशोमोन चित्रपटा सारखा रुची नारायण यांचा गिल्टी हा कियारा अडवाणी यांच्या पात्रा भोवती गुंफला गेलाय.

कियारा अडवाणी नानकी नावाचं पात्र साकारत आहेत. नानकी एक गीतकार आहे आणि तिच्या बॉयफ्रेंड विजय प्रताप सिंह उर्फ वीजे (गुरफतेह पीरजादा) वर बलात्काराचा आरोप झालाय. हे नेटफ्लिक्स ओरिजिनल ६ मार्च २०२० पासून बघता येईल.

ट्रेलरच्या सुरुवातीला नानकी तिची गोष्ट सांगायला सुरुवात करते. तिच्या दृष्टिकोनातून तिचा संघर्ष दिसून येतो. नानकी एका म्युझिक बँडची सदस्य आहे आणि तिच्यासोबत वीजे, ताशी आणि हार्डी सुद्धा या बँड मध्ये आहेत.

सेंट मार्टिन्स कॉलेजचा त्यांचा ग्रुप प्रसिद्ध होतोय, मात्र त्यांच्यावर इतरांच्या नजरा सुद्धा वाढताहेत. यापैकीच एक म्हणजे तनु शर्मा (आकांक्षा रंजन शर्मा), जी नंतर वीजे वर बलात्काराचा आरोप सुद्धा करते. नंतर आरोप-प्रत्यारोपाचे खेळ सुरु होतात आणि दोन्ही पक्ष याला प्रतिशोधाचं नाव देतात.

नारायण यांच्या ट्रेलर मध्ये अनेक उत्कंठावर्धक गोष्टी आहेत. वीजेचा फ्लर्टी स्वभाव आणि नानकीचं रागाने निघून जाणं असो, नानकीने तनुला थोबाडीत मारणं असो किंवा तनुचं नानकी आणि तिच्या मित्रांवर रॅगिंग आणि छळाचा आरोप असो, अशी अनेक उदाहरणं चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवतात.

ट्रेलर मध्ये कुणावरही आरोप सिद्ध होताना दाखवलेलं नसलं तरी असं वाटतंय कि नानकीचा व्यक्तिगत संघर्ष, तिचं चांगल्या पार्श्वभूमीचं असणं, पक्षपात आणि तिचा एकूण संघर्ष हाच चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

सत्य शोधणारा वकील म्हणून ताहेर शब्बीर काम करत आहेत तर बचाव पक्षाची वकील म्हणून निकी वालिया काम करत आहेत.

गिल्टीचं लेखन नारायण, अतिका चौहान आणि कनिका ढिल्लों यांनी केलं आहे.