आदित्य सरपोतदार दिग्दर्शित द रायकर केस हि वेब-सिरीज एका कुटुंबाची गोष्ट आहे. असं एखादं वाक्य ऐकल्या नंतर साधारण असं वाटतं हि नाते संबंधांवरची कौटुंबिक गोष्ट असेल. पण त्याचा इथे दुरान्वये हि संबंध नाही.
हि वेब-सिरीज एका तरुण नाईक रायकर नामक मुलाच्या खुनाबद्दल आहे. इन्सपेक्टर जॉन परेरा (निल भूपालम) चा हा विश्वास आहे कि तरुण ने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आलाय आणि यात राजकीय व्यक्तिमत्व असलेले तरुणचे वडील यशवंत (अतुल कुलकर्णी) आणि आई साक्षी (अश्विनी भावे) यांचा काहीतरी संबंध आहे, असंही त्याला वाटत राहतं. तरुणची बहीण एताशा (पारुल गुलाटी) परेराला तपासात मदत करते.
या वेब-सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय. यात तरुणच्या व्हॉइस-ओव्हर मध्ये हे सांगण्यात येतं कि त्याच्या मृत्यूला त्याचं कुटुंब जबाबदार आहे. एकलव्य (ललित प्रभाकर) या कुटुंबाच्या बाहेरील एक व्यक्ती आहे ज्याची या गोष्टीत महत्वाची भूमिका आहे.
आपल्या कुटुंबाविरुद्ध, खास करून आपल्या आई-वडिलां विरुद्ध असलेल्या मुलाची गोष्ट फक्त नवीन नसून तुम्हाला भावनिक करायला हि पुरेशी आहे. ट्रेलर वरून कळतं कि कथासूत्राच्या काही गोष्टी सूक्ष्म पद्धतीने हाताळण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा हि वेब-सिरीज वेगळी ठरतेय.
कुलकर्णी, भावे, भूपालम, प्रभाकर आणि इतर कलावंत उत्तम फॉर्ममध्ये दिसताहेत. द रायकर केस ९ एप्रिल पासून वूट ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवण्यात येतेय. ट्रेलर येथे पहा.