{ Page-Title / Story-Title }

News Marathi

एक थी बेगम ट्रेलर – एका मोठ्या गँगस्टरला मारायला सज्ज आहे घायाळ स्त्री

Read in: English


या द्विभाषिक वेब-सिरीज मध्ये अनुजा साठे, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर आणि संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Keyur Seta

हिंदी चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डवर आधारित अनेक चित्रपट झालेत. गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा या शैलीतले चित्रपट येत आहेत. अशातच लेखक-दिग्दर्शक सचिन दरेकर यांची द्विभाषिक वेब-सिरीज वेगळी ठरतेय.

१९८६ मध्ये गोष्ट मुंबईमधून सुरु होते. झहीर (अंकित मोहन) एका गॅंग साठी काम करत असतो. या गँगचा नायक हा मोठा गँगस्टर (कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमवर आधारित व्यक्तिरेखा) आहे, जो पश्चिम आशिया मधून काम करत असतो. गॅंग मधील लोकांसोबत न पटल्याने झहीर अंडरवर्ल्ड सोडायचा निर्णय घेतो. पण गँगस्टर त्याला फेक पोलीस एन्काउंटर मध्ये संपवून टाकतो.

झहीरची पत्नी सपना (अनुजा साठे) पूर्णपणे उध्वस्त होते, कारण तिचं जन्माला न आलेलं मुलंही यात मारले जाते. पण ती स्वतःला सावरते आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार सगळ्यांनाच संपवण्याचा निर्धार करते. अर्थात त्यात गँगचा मुख्य गँगस्टर पण आलाच.

गँगस्टर आणि अंडरवर्ल्डवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, मात्र गॅंगस्टरच्या बायकोने नवऱ्याचा बदला घेत गॅंग मधील त्याच्या मालकाला संपवणे अशी गोष्ट कुठे बघितल्याचं आठवत नाही. एका संपूर्ण गॅंग आणि भ्रष्ट पोलिसांच्या विरुद्ध एक स्त्री, हि कल्पना निश्चितच रोचक आहे.

अनुजा साठे ज्या आत्मविश्वासाने वावरताना दिसताहेत, त्यावरून त्यांची निवड योग्य आहे असं वाटतंय. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर किंवा इतर कलाकार ट्रेलर मध्ये फार वेळ दिसत नाहीत. त्यांच्या व्यक्तिरेखेला धरून काही चकित करणाऱ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित त्यांना फारसं दाखवण्यात आलं नसावं.

एक थी बेगम एमएक्स प्लेयर वर ८ एप्रिल पासून दाखवण्यात येतेय. ट्रेलर येथे पहा.

Related topics

MX Player Trailer review