कंगना रनौत यांच्या बहिणीने ह्रितिक रोशन वर मेंटल है क्या ची नकारत्मक प्रसिद्धी करण्याचा आरोप केला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ह्रितिक ने हा निर्णय घेतला.
ह्रितिक रोशन यांनी सुपर ३० च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी
मुंबई - 09 May 2019 20:29 IST
Updated : 10 May 2019 22:52 IST
Shriram Iyengar
ह्रितिक रोशन यांची प्रमुख भूमिका असलेल्या सुपर ३० च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ह्रितिक रोशन यांनी ट्वीट करून सांगितले की त्यांनी निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट कडे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. मानसिक त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
— Hrithik Roshan (@iHrithik) May 9, 2019
सोशल मीडियावर केलेल्या विधानात त्यांनी म्हटले, "माझा चित्रपट कोणत्याही मीडिया सर्कस ला बळी पडू नये आणि मला अजून जास्त मानसिक त्रास होऊ नये यासाठी मी सुपर ३० च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे."
त्यांनी पुढे म्हटले, "चित्रपट पूर्ण तयार आहे तरीही मी माझ्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. नवीन तारीख आम्ही लवकरच अनाऊन्स करू."
सुपर ३० २६ जुलैला रिलीज होणार होता, परंतु बालाजी मोशन पिक्चर्स ने त्यांचा चित्रपट मेंटल है क्या त्याच दिवशी रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
कंगना आणि ह्रितिक यांच्यामध्ये झालेला वाद लक्षात घेता एकता कपूर यांनी सोशल मीडियावरून संदेश दिला की कोणत्याही विवादाशिवाय त्यांचा चित्रपट रिलीज व्हावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांच्या चित्रपटाविरुद्ध सोशल मीडियावर चाललेल्या नकारत्मक प्रसिद्धीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कंगनाची बहीण रंगोली तांडेल यांनी सुद्धा ट्विटरवर ह्रितिक रोशन आणि त्यांच्या पीआर मॅनेजरवर मेंटल है क्या ची नकारात्मक प्रसिद्धी केल्याचा आरोप केला. "तू आणि तुझे पीआर कंगनाला जितकं खाली पाडायचं प्रयत्न कराल तेवढाच ती उठून वर येईल, आतापर्यंत तिने यामध्ये लक्ष दिलं नव्हतं पण आता तू बघच... जादू."
२०१६ पासून कंगना आणि ह्रितिक मध्ये वाद चालू होते हे सर्वसृत आहे. कंगना यांनी ह्रितिकवर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. ह्रितिकने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. दोघांमध्ये कायदेशीर लढाई देखील झाली होती.
सध्या बंद असलेल्या फँटम फिल्म्स या प्रोडक्शन हाऊस मधील एका कर्मचारी महिलेने सुपर ३० चे दिग्दर्शक विकास बहल यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आणि या विवादामुळेच फँटम प्रोडक्शन बंद पडले.
रिलायन्स एंटरटेनमेंट चे सीईओ शिबाशिश सरकार यांनी नंतर सांगितले की सुपर ३० च्या दिग्दर्शनाचे श्रेय विकास बहल यांना दिले जाणार नाही.
तर दुसरीकडे रनौत सुद्धा हल्ली विवाद मध्ये अडकल्या होत्या. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) च्या दिग्दर्शनाची जबाबदारी क्रिश कडून स्वतः कडे खेचून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता.
Related topics