{ Page-Title / Story-Title }

News Hindi

आमिर खान यांचा लाल सिंह चड्ढा ख्रिसमस २०२० ला रिलीज होईल

Read in: English


फॉरेस्ट गम्प चा हिंदी रीमेक चे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार असून अतुल कुलकर्णी ने चित्रपटाची पटकथा लिहली आहे.

फोटो- शटरबग्स इमेजेस.

Mayur Lookhar

आमिर खान ने त्यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून आपल्या पुढील चित्रपटाची अनांउन्समेंट केली. लाल सिंह चड्ढा हा आमिर खान यांचा पुढील चित्रपट ऑस्कर विजेता फॉरेस्ट गम्प चा अधिकृत रीमेक आहे. निर्माते वायाकॉम१८ ने २०२० ख्रिसमस ला चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे.

वायाकॉम१८ ला सांगण्यात आनंद होत आहे की अद्वैत चंदन दिग्दर्शित आणि अतुल कुलकर्णी लिखित आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंह चड्ढा ख्रिसमस २०२० ला रिलीज होईल.

दंगल (२०१६) नंतर आमिर खान पुन्हा आपला चित्रपट ख्रिस्तमस च्या मुहूर्तावर रिलीज करणार आहेत. आमिर खान यांचे या अगोदरचे दोन चित्रपट, सिक्रेट सुपरस्टार (२०१७) आणि थग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८) दिवाळी ला रिलीज झाले होते. आमिर खान यांचे गजनी (२००८) आणि ३ इडियट्स (२००९) सारखे सुपरहिट चित्रपट ख्रिसमसलाच रिलीज झाले होते.

रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित फॉरेस्ट गम्प (१९९४) ची सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणना केली जाते. विन्स्टन ग्रूम यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. टॉम हँक्स चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.

चित्रपटात गम्प चा जीवन प्रवास दाखवला आहे. मतिमंद असल्यामुळे सर्वजण त्याला लहानपणी चिडवतात. पण तो आपल्या जीवनात अमेरिकन इतिहासातील काही महत्वाच्या क्षणांचा साक्षिदार बनतो.

सदुसष्टाव्या अकादमी अवार्डस मध्ये फॉरेस्ट गम्प ने उत्कृष्ट चित्रपट, उक्तृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट अभिनेता चे पुरस्कार पटकावले होते.

Related topics