{ Page-Title / Story-Title }

News Marathi

गर्लफ्रेंड चित्रपटाचा दुसरा टीजर – सई ताम्हणकर स्वतःच्या विचारांमध्येच दंग

Read in: English


अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Suyog Zore

गेल्या आठवड्यात अमेय वाघ यांनी गर्लफ्रेंड चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. अमेय यांनी या चित्रपटात नचिकेत प्रधान ही भूमिका साकारली आहे. या नचिकेतची गर्लफ्रेंड कोण असेल हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात  पोस्टर रिलीज झाल्यावर या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

पोस्टरवर अमेय वाघ आणि सई ताम्हणकर मध्यभागी होते. नचिकेतची गर्लफ्रेंड कोण असले या प्रश्नाचे उत्तर मिळाले असले तरी ताम्हणकर साकारत असलेल्या अलीशाच्या पात्राविषयी उत्सुकता निर्माण झाली.

सई ताम्हणकर यांनी सोशल मीडियावर गर्लफ्रेंड चा दुसरा टीजर रिलीज केला.

या नवीन ३५ सेकंड च्या टीजरमध्ये सतत एकटी आणि आपल्याच विचारांमध्ये गुंग असलेली अलीशा नेहमी गार्डनमध्ये खेळताना, ब्रेक-डान्स करताना आणि ट्रॅम्पोलिन वर उड्या मारताना दिसत आहे.

टीजरवरून अलीशा एक अबोल मुलगी आहे असा अंदाज बांधता येतो. "संगीत ऐकू न येणाऱ्या लोकांना नृत्य करणारी माणसे वेडी आहेत असेच वाटते" हे वाक्य तुम्हाला टीजर पाहताना नक्की आठवेल. महान विचारवंत फ्रेडरिक निटचा यांचे हे उद्गार आहेत असे म्हटले जाते. जॅझ या संगीत प्रकारात मोडणारं पार्श्वसंगीत देखील तुमचं लक्ष वेधून घेतं.

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. उपेंद्र सिद्धयेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी मुंबई मेरी जान (२००८), किल्ला (२०१५) आणि द्रिश्यम (२०१५) यांसारख्या चित्रपटांची पटकथा लिहली आहे.

या दोन टीजरमुळे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या व्यक्तिरेखांविषयी आणि चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. २६ जून ला गर्लफ्रेंड चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. 
खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.

Related topics

Teaser review