{ Page-Title / Story-Title }

News Hindi Tamil Telugu

साहो पोस्टरवर मोटारबाईकवर स्वार प्रभास

Read in: English | Hindi


सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर प्रभास ऍक्शन हिरोच्या रूपात दिसत आहेत.

Sonal Pandya

सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत असलेला साहो (२०१९) १५ ऑगस्टला अगदी वाऱ्याच्या वेगाने चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार असे वाटते.

सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर प्रभास ऍक्शन हिरो च्या रूपात दिसत आहेत. प्रभास मोटारबाईकवर स्वार होऊन तुटलेल्या काचांची पर्वा न करता वाऱ्याच्या वेगाने जाताना दिसत आहेत.

यु व्ही प्रोडक्शन्स आणि टी-सिरीज च्या निर्मीतीखाली बनलेला साहो हिंदी, तमिळ आणि तेलगू अश्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल. दोन वर्षांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात झाली होती.

प्रभास व्यतिरिक्त या चित्रपटात श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ आणि अरुण विजय महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.

रु३०० कोटीच्या बजेटमध्ये बनलेला साहो या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Related topics

Poster review