अश्विन सरवनन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये १४ जून ला रिलीज होईल.
गेम ओव्हर टीजर – या थरारपटात व्हिडिओ गेम चा खेळ तापसी पन्नू ला महागात पडू शकतो
मुंबई - 15 May 2019 14:00 IST
Updated : 16 May 2019 2:36 IST
Sonal Pandya
घड्याळाची टिकटिक, जॉगिंग करतानाचा श्वासोच्छवासाचा आवाज आणि धडकत असणाऱ्या हृदयाचा आवाज. दिग्दर्शक अश्विन सरवनन यांनी गेम ओव्हर (२०१९) या आपल्या पुढील चित्रपटात तापसी पन्नू यांची दिनचर्या दाखवली आहे.
तापसी पन्नू यांचा पात्र घरातून काम करतो आणि हळूहळू तिच्या लक्षात येते की तिच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तिच्यासोबत घडणाऱ्या असंबद्ध घटनांचा संबंध व्हिडिओ गेम्सशी आहे. चित्रपटाचे नाव सुद्धा गेम ओव्हर असल्याने हे साहजिकच आहे.
तापसी यांच्या पात्रला व्हिडिओ गेम्स, कॉमिक्स आणि कार्टून्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. घरातच उभ्या केलेल्या तिच्या ऑफिसमध्ये तिने वंडर वूमन, टॉम अँड जेरी यांचे छोटे मुर्त्या ठेवले आहेत. मारियो ब्रोस आणि रेड डेड रिडम्प्शन २ या गेम्स ची सुद्धा ती फॅन आहे, तिच्या ऑफिसमध्ये या दोघांचे पोस्टर आहेत.
ती सतत पॅकमॅन हा गेम खेळत असते आणि या गेम चा तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी काहीतरी संबंध आहे असे वाटते. टीजर च्या शेवटी आपल्याला तिचा व्हिडिओ गेम कन्सोल जळताना दाखवला आहे.
काही कारणास्तव तापसी यांचे पात्र पायाने अधू होते आणि फक्त व्हीलचेअर वरच असते. ती व्हीलचेअर वर असताना एक काळी सावली तिचा पाठलाग करत असते.
अश्विन सरवनन ने या अगोदर माया (२०१५) चे दिग्दर्शन केले आहे. टीजरमधून तापसी यांच्या पात्राविषयी आपल्या मनात काळजी निर्माण करण्यास अश्विन यशस्वी झाले आहेत.
काव्या रामकुमार आणि अश्विन यांनी मिळून चित्रपटाची पटकथा लिहली आहे. १४ जून ला हिंदी, तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत का ते आम्हाला कळवा.
Related topics
Teaser review