भारताच्या १९८३ च्या क्रिकेट विश्वकप जिंकण्यापर्यंतच्या प्रवासावर बनणाऱ्या '८३ च्या निर्मात्यांमध्ये आता अजून एका नाव जोडले गेले आहे आणि ते आहे साजिद नाडियाडवाला.
मधू मन्टेना, विष्णू इंदुरी आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्यासोबत आता साजिद नाडियाडवाला सुद्धा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २५ जून १९८३ ला बलाढ्य वेस्ट इंडिज ला नमवून विश्वविजेतेपद पटकावले होते. कबीर खान आपल्या चित्रपटात हा भारतीय संघाचा अविश्वसनीय प्रवास दाखवणार आहेत.
नाडियाडवाला आणि मन्टेना पुढील तीन वर्षांत अजून तीन चित्रपट बनवणार आहेत. "या चारही स्क्रिप्ट्स अप्रतिम आहेत. एक निर्माता म्हणून तुम्हाला तुमच्या कन्टेन्ट वर पूर्ण विश्वास असायला हवा. मी टीव्ही वर लाइव्ह तो क्षण पहिला होता. काही चित्रपट रिलीज होण्याआधीच आपल्याभोवती एक वलय निर्माण करतात आणि '८३ हा त्यातलाच एक चित्रपट आहे," नाडियाडवाला म्हणाले.
"साजिद ला चित्रपटाचा कन्टेन्ट आणि बिजिनेस या दोन्ही गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे. आम्हाला त्यांच्या पार्टनरशिप चा खूप फायदा होईल," मन्टेना म्हणाले.
'८३ मध्ये रणवीर सिंह, पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, ऍमी कर्क आणि इतर कलाकार आहेत. हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट १० एप्रिल २०२० ला रिलीज होणार आहे.