{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सुजीत सरकार यांच्या गुलाबो सीताबो मध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा

Read in: English


या चित्रपटातून आयुष्मान खुराणा आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Our Correspondent

सुजीत सरकार यांनी अमिताभ बच्चन सोबत पिकू (२०१५) आणि आयुष्मान खुराणा सोबत विकी डोनर (२०१२) हे उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. आता या दोघांना घेऊन ते गुलाबो सीताबो असे विचित्र शीर्षक असलेला चित्रपट बनवत आहेत. याच वर्षी नोव्हेंबर मध्ये हा चित्रपट रिलीज होईल.

जुही चतुर्वेदी लिखित या चित्रपटाची कथा लखनऊ शहरामध्ये घडते. रुनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित गुलाबो सीताबो हा खास सुजीत सरकार यांच्या शैलीतला विनोदाचे आवरण घालून सामाजिक संदेश देणारा चित्रपट असेल असं वाटतं.

या दोन्ही अभिनेत्यांना एकत्र आणण्याबद्दल दिग्दर्शक सुजीत सरकार म्हणाले, "जुही आणि मी खूप वेळापासून या स्क्रिप्टवर काम करत होतो. जुही कधीही कथा लिहते तेव्हा त्यात तिची स्वतःची ट्रेडमार्क विनोदी शैली असते. कथा वाचताच मी माझे मित्र आणि निर्माते रुनी यांना कथा ऐकवली आणि आयुष्मान व अमिताभ बच्चन यांना ऐकवण्यास उत्सुक होतो.

"अगोदर मला वाटले की चित्रपटाची पूर्वतयारी करायला वेळ लागेल, परंतु दोघेही अभिनेते आणि इतर मेम्बर्स इतके उत्सुक होते की आम्ही लगेच त्यावर काम सुरु केले आणि आता याच वर्षी चित्रपट रिलीजसुद्धा करणार आहोत.

"विकी डोनर (२०१२) आणि पिकू (२०१५) नंतर मला दोघांसोबत एका विनोदी चित्रपटात काम करायचे होते आणि या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला."

शीर्षकाबद्दल बोलताना सुजीत म्हणाले, "चित्रपटाची कथा लखनऊ शहरात घडते आणि गुलाबो सीताबो हा लखनऊ मध्ये सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. या शब्दाचा चित्रपटाशी काय संबंध आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच समजेल."

२०१८ मध्ये सिनेस्तान ला दिलेल्या मुलाखतीत जुही चतुर्वेदी म्हणाल्या होत्या की त्यांच्या कथा नेहमी अशा शहरांमध्ये घडतात ज्या शहरांबद्दल त्यांना माहिती असेल. या चित्रपटाची कथा लखनऊ मध्ये घडते आणि जुही चतुर्वेदींचे संपूर्ण बालपण लखनऊमध्ये गेले.

या आठवड्यात मदर्स डे च्या निमित्ताने सुजीत सरकार यांनी बनवलेल्या एका म्युजिक व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. सरकार ने निर्मिती केलेल्या पिंक (२०१६) या कोर्टरूम ड्रामामध्ये सुद्धा अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

सुजीत सरकार शाहिद क्रांतिकारक सरदार उध्धम सिंह यांचा जीवनपट सुद्धा बनवत आहेत. या जीवनपटात विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसतील.

Related topics