काही दिवसांपूर्वी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमेय वाघ यांनी एक नवीन क्लुप्ती लढवली होती. त्यांनी फेसबुक वर स्वतःचा एका मुलीच्या आकृतीसोबत फोटो शेर केला आणि लोकांना त्या मुलीसाठी नाव सुचवायला सांगितले. गुरुवारी त्यांनी मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंड चे नाव टाकायला सांगितले.
अमेय वाघ ने शुक्रवारी हे सर्व कशासाठी चाललंय याचा खुलासा केला. गर्लफ्रेंड असे शीर्षक असलेला त्यांचा नवीन चित्रपट येत आहे. चित्रपटात ते नचिकेत नावाच्या एका सिंगल मुलाची भूमिका साकारत आहेत.
"जगातल्या सगळ्या सिंगल पोरांना पडलेला एकच प्रश्न, 'गर्लफ्रेंड'!" या कॅप्शनसोबत त्यांनी फेसबुक वर पोस्टर शेर केले.
पोस्टरमध्ये एका चष्मीश अभ्यासू मुलासारखा त्यांचा लुक आहे, म्हणूनच कदाचित नचिकेत अजून सिंगल असावा.
पोस्टरवर मुलीची फक्त आकृती आहे. नायिकेच्या भूमिकेत कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी असे केले असावे.
मुंबई मेरी जान (२००८), किल्ला (२०१४) आणि मांझा (२०१७) सारखे उत्कृष्ट चित्रपट लिहिल्यानंतर उपेंद्र सिद्धये प्रथमच दिग्दर्शन करणार आहेत. स्मोक (२०१८) ही मालिका देखील त्यांनी लिहली आहे.
अनिश जोग आणि रंजीत गुगले हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या अगोदर त्यांनी मुरंबा (२०१७) या हिट चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटात अमेय वाघ आणि मिथिला पालकर प्रमुख भूमिकेत होते.